आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Pratigya Fame Actor Anupam Shyam Ojha Is No More, 6 Days Ago The Family Hospitalized Him After His Condition Became Critical

दुःखद:'प्रतिज्ञा' फेम अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन, मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे मालवली प्राणज्योत; 6 दिवसांपासून रुग्णालयात सुरु होते उपचार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ते 63 वर्षांचे होते.

'बँडिट क्वीन' (1994)), 'लज्जा' (2001), 'नायक' (2001) आणि 'शक्ती: द पॉवर' (2002) यासारखे अनेक बॉलिवूड बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रविवारी सांयकाळी मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'प्रतिज्ञा' या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या भूमिकेतून अनुपम यांनी घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर गोरेगावस्थित एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आजारी असतानाही केली होती शूटिंग
वृत्तानुसार, आजारी असतानाच अनुपम हे स्टार भारतच्या प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रकरणामध्ये सहभागी झाले होते. मुंबईमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती फारच खालावली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचे निधन झाले. दिग्दर्शक अर्जुन पंडित आणि अभिनेता मनोज जोशी यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

...म्हणून त्यांनी स्वीकारली होती मालिकेची ऑफर

प्रकृती ठीक नसतानाही अनुपम प्रतिज्ञा या मालिकेच्या दुस-या सीझनसाठी आपला होकार दिला होता.याचे कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की, प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडते आणि चाहत्यांना त्यांना निराश करायचे नव्हते म्हणून त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती. ते म्हणाले होते की, 'मृत्युशी युद्ध सुरू होते. तिथे जिंकून आलो. आता प्रतिज्ञा मालिकेच्या माध्यमातून मला पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.'

मागील वर्षी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगितले होते
मागील वर्षी अनुपम श्याम किडनीच्या आजाराने रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत कलाकारांकडे मदत मागितील होती. त्यानंतर मनोज बाजपेयींसह अनेकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता.

'प्रतिज्ञा' मालिकेतील ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध
'मन की आवाज प्रतिज्ञा' या टीव्ही मालिकेत अनुपम यांनी साकारलेले ठाकूर सज्जन सिंह हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील असलेले अनुपम लखनौच्या भारतेंदु अकादमीच्या नाट्य कला अकादमीचे माजी विद्यार्थी होते. येथे त्यांनी 1983-1985 दरम्यान अभिनयाचे धडे गिरवले होते. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे ते समर्थकही राहिले आहेत.

अनुपम यांचे हे आहेत लोकप्रिय चित्रपट
अनुपम यांनी 'सरदारी बेगम' (1996)), 'दुश्मन' (1998), 'कच्चे धागे' (1999), 'परजानियां' (2005), 'गोलमाल' (2006), 'स्लमडॉग मिलेनिअर' (2008) आणि 'मुन्ना माइकल' (2017) या चित्रपटांमध्ये अभिनय केला. टीव्हीवर ते अखेरचे 'कृष्णा चली लंडन' (2018-2019) मध्ये दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...