आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटो गॅलरी:रंगभूमीवर उत्कृष्ट कलाकार होती प्रेक्षा मेहता, 'क्राइम पेट्रोल', 'मेरी दुर्गा' आणि 'लाल इश्क'मध्ये केलं होतं काम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षा मेहता केवळ 25 वर्षांची होती आणि मागील तीन वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला होती.

टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने सोमवारी इंदूर येथील तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून काम नसल्याने ती नैराश्यात होती आणि गप्प राहात होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या कुटुंबासाठी एक पत्र लिहिले आहे.

अभिनेत्री प्रेक्षा ही एक रंगभूमीवरची कलाकार होती. मंटो लिखित 'खोल दो' या नाटकातील महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन तिने पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल टाकले होते. लोकांना तिचे काम इतके आवडले की त्यानंतर तिला सतत काम मिळू लागले. 

पहिल्या उत्कृष्ट नाटकानंतर तिने 'बुंदे', 'खुबसूरत बहू', 'प्रतिबिंबि', 'पार्टनर', 'अधुरी औरत' आणि 'थ्रिल'मध्ये देखील काम केले. चांगल्या अभिनयासाठी प्रेक्षाला तीन राष्ट्रीय नाट्य महोत्सवांमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. अभिनयाबरोबरच प्रेक्षाने तायक्वांदोचेही प्रशिक्षण घेतले होते.

सोनी टीव्हीच्या 'क्राइम पेट्रोल' या शोने प्रेक्षाला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतन ओळख मिळाली. ती क्राइम पेट्रोलच्या बर्‍याच भागांचा एक भाग होती. याशिवाय, 'लाल इश्क', 'सिद्धी विनायक', 'तू आशिकी' आणि 'मेरी दुर्गा' यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्येही तिने काम केले आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रेक्षाची दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेश स्कूल ऑफ ड्रामा येथे निवड झाली होती.

करिअर करण्यासाठी प्रेक्षा आपल्या कुटुंबापासून दूर तीन वर्षांपासून मुंबईत राहात होती. पण लॉकडाऊनच्या आधी ती घरी आली. वर्षभरापासून काम न मिळाल्यामुळे ती खूपच अस्वस्थ होती आणि बर्‍यापैकी शांत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरी सेक्शन आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्ये निराशाजनक स्टेटस शेअर केले होते. त्यात तिने लिहिले, 'सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्नं मरुन जाणं'. 20 मे रोजी इंस्टा लाइव्ह सत्रात तिने आपल्या आर्ट जर्नीवर बातचीत केली होती. 

प्रेक्षाने सुसाइड नोटही सोडली असून तिने आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असे म्हटले आहे. तिने लिहिले, ''माझ्या तुटलेल्या स्वप्नांनी माझ्यातील आत्मविश्वास ढासळला आहे. मी मेलेल्या स्वप्नांसह जगू शकत नाही. या नकारात्मकतेसह जगणे कठीण आहे. मी गेल्या एक वर्षापासून खूप प्रयत्न केले. पण मी आता खूप थकले आहे.''

बातम्या आणखी आहेत...