आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
25 वर्षीय टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहताने सोमवारी इंदूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबल्यामुळे ती अस्वस्थ होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला. सोबतच त्यांनी आपल्या मुलीवर लग्नासाठी दबाव आणत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
प्रेक्षाचे वडील म्हणाले, "लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबल्यामुळे ती अस्वस्थ होती. मुंबईत लॉकडाऊन वाढल्यामुळे ती खूप नाराज असायची. तिला कधीच रिकामे बसणे आवडत नव्हते. जेव्हा ती वृत्तपत्रांमध्ये लॉकडाऊनविषयी वाचायची, तेव्हा मी तिला म्हणायचो की, काळजी करू नको. पण ती इतके टोकाचे पाऊल उचलेल याची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती. "
रिपोर्ट्सनुसार प्रेक्षाने तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम लाइव्हमध्ये एका मित्राला सांगितले होते की, तिचे पालक तिला वारंवार लग्न करण्यास सांगत आहेत. यावर तिचे वडील म्हणाले, "प्रेक्षाने आधीच सांगितले होते की, चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर ती 2-3 वर्षांनंतर लग्न करेल. लग्नासाठी आम्ही तिच्यावर कधी दबाव आणला नाही. पण कधीकधी आम्ही तिच्याकडे लग्नाचा विषय नक्की काढायचो."
प्रेक्षाच्या सुसाईड नोटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिचे वडील म्हणाले की, तिने असे का लिहिले हे आम्हाला समजत नाहीये. इंदूरमधील हिरा नगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजीव भदोरिया यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षाने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, "माझ्या भंगलेल्या स्वप्नांमुळे माझा आत्मविश्वास ढासळला आहे. मी मृत स्वप्नांसह जगू शकत नाही. या नकारात्मकतेसह जगणे कठीण आहे. मी वर्षभरापासून खूप प्रयत्न केले, पण आता मी खूप थकलीय."
प्रेक्षाने तिच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही. सोमवारी रात्री आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर निराशाजनक स्टेटस लिहिले होते. प्रेक्षाने लिहिले होते, 'सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्नं मरुन जाणे'. तिने 'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' या शोमध्ये काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.