आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द दिशूल वेडिंग:राहुल वैद्य आणि दिशा परमार लग्नाच्या बेडीत अडकले; गुडघ्यावर बसून दिशाला घातली अंगठी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल आणि दिशा यांनी त्यांच्या लग्नाला द दिशूल वेडिंग असे नाव दिले असून मागील तीन दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे समारंभ सुरु आहेत.

प्रत्येकाने सारखी शेरवानी परिधान केली
वरातीत राहुलसोबत आलेल्या त्याच्या मित्रांनी एकसारखी शेरवानी परिधान केली. सोबतच गुलाबी पगडी घातली होती. लग्नात बिग बॉसमध्ये राहुल वैद्यसोबत दिसलेला अली गोनीही उपस्थित होता.

यापूर्वी झाली होती हळदी सेरेमनी
राहुल आणि दिशाच्या मेहंदी आणि हळदी सेरेमनीचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.राहुल आणि दिशाने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लग्न पत्रिका पोस्ट करून सांगितली होती.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या 14 व्या पर्वात राहुलने दिशाला प्रपोज केले होते. यावर दिशाने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असे लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.