आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू टीव्ही शो:‘इश्क पर जोर नहीं’ मालिकेतून होतेय अभिनेता रजत वर्माची धमाकेदार एंट्री, बेहद 2 मधून आला होता प्रसिद्धीझोतात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजत वर्मा मालिकेत कार्तिक मल्होत्राची भूमिका साकारणार आहे.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आता 'इश्क पर जोर नहीं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या नव्या मालिकेत नव्या काळातील तरुणाईची प्रेमकथा दर्शवण्यात आली असून यात अहान मल्होत्रा आणि इश्की यांची प्रेम व लग्नासंबंधींची विरोधी विचारसरणी अधोरेखित झाली आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रजत वर्मा या मालिकेत कार्तिक मल्होत्राची भूमिका साकारणार असून तो मालिकेतील अहानचा लहान भाऊ आहे. कार्तिक मल्होत्रा हा टिपिकल पुढील पिढीतील मुलगा आहे. तो मोकळ्या विचारांचा असून त्याची मते स्पष्ट आहेत. समाजातील पारंपरिक प्रथांना आव्हान देणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या वातावरणात तो वाढलेला असतो. मनाने प्रेमळ असून जोडीदारासोबत एक समानतेचे नाते जपण्याची त्याची इच्छा आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना रजत वर्मा म्हणाला, “कार्तिक हे पात्र सर्वांचे आवडते आहे. तो उत्साही, आत्मविश्वासू, ध्येयवादी असून त्याच्या कुटुंबाला सर्वोच्च स्थान देतो. अनेक दृष्टीने कार्तिकचे पात्र माझ्याशी मिळतेजुळते आहे. प्रेम आणि लग्नाबाबत आमच्या दोघांचेही विचार सारखे आहेत. समानतेच्या तत्त्वाबाबत आम्ही ठाम आहोत. कार्तिकला स्वत:ची मते असल्याने प्रेक्षक आपोआप त्याच्याशी जुळतील. मी माझ्या कामाचा आनंद घेत आहे आणि माझे पात्र प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा करतो.” रजतने यापूर्वी जेनिफर विंगेट स्टारर 'बेहद 2' या मालिकेतून प्रसिद्धी एकवटली होती.

बातम्या आणखी आहेत...