आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील आगामी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही ऐतिहासिक मालिका अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारीत आहे. 18 व्या शतकात सामाजिक बंधनांविरोधातील संघर्षात सर्व अडचणींवर तिने मात केली व यासाठी तिला सासरे ‘मल्हार राव’ यांची साथ मिळाली. अशा प्रकारे अहिल्याबाई एक मोठी धाडसी स्त्री बनली. एवढेच नाही तर पुढील अनेक पिढ्यांसमोर ती एक आदर्श ठरली. अभिनेते राजेश श्रुंगारपुरे हे या मालिकेत ‘मल्हार राव’ यांचे प्रमुख पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी राजेश सध्या घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहेत.
राजेश यांनी या मालिकेसाठी घेत असलेल्या प्रशिक्षणाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मल्हार राव होळकर यांचे पात्र साकारताना, अनेक गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात. विशेषत: पोशाख, बॉडी लँग्वेज आणि शब्दोच्चार. शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा घोडेस्वारी आणि तलवारबाजी या दोन गोष्टी कठीण पण प्रतिष्ठित अशा वाटल्या. घोडेस्वारीमुळे मला माझे स्नायू अधिक बळकट करण्यास मदत झाली. तर तलवारबाजीमुळे माझी शरीरयष्टी आणि संतुलन साधता आले. या प्रभावामुळे मी मागील एक महिन्यापासून खूप आनंदी आहे. एक अभिनेता म्हणून, संबंधित पात्राला पूर्ण न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. मल्हार राव होळकर साकारताना मी जे करतोय, त्यासाठी माझ्यातील सर्वोत्कृष्ट देईन, असे मला वाटते. अर्थात मला मार्गदर्शन करणारे व माझ्या पाठिशी उभ्या राहणारे सर्व प्रशिक्षक आणि अॅक्शन डायरेक्टर्स यांना मी आवर्जून धन्यवाद देतो.”
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही नवी कलाकृती येत्या 4 जानेवारी पासून दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.