आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस OTT:बिग बॉसच्या घरात भावूक झाला राकेश बापट,  म्‍हणाला - 'मला असे पाहून माझ्या वडिलांना आनंद होणार नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राकेश बापट त्‍याच्‍या वडिलांची आठवण काढत भावूक झाला.

बिग बॉस ओटीटी हा शो सुरू होऊन 10 दिवस देखील झाले नाही आणि प्रेक्षकांना घरातील सदस्‍य भावूक होताना पाहायला मिळत आहे. धाडस, द्वेष, भावूक क्षण किंवा विनोदी क्षण असो बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये सर्वकाही पाहायला मिळत आहे. असा एक प्रसंग आला की, शांत व संयमी स्‍पर्धक राकेश बापट त्‍याच्‍या वडिलांची आठवण काढत भावूक झाला.

प्रतीकने वैयक्तिक कमेंट करत राकेशला डिवचल्‍यामुळे राकेशचा स्‍वत:वरील ताबा सुटला आणि त्‍याने प्रतीकला धडा शिकवण्‍याचे ठरवले. त्‍यानंतर घराचा बॉस मॅन ढसाढसा रडू लागला आणि म्‍हणाला, 'मला असे पाहून माझ्या वडिलांना आनंद होणार नाही.' करण जोहरने राकेशला स्पिनलेस म्‍हटले आहे आणि घरातील काही सदस्‍य त्‍याला भडकवत आहेत.

बिग बॉस ओटीटी घरातील त्‍याचे मित्र शमिता शेट्टी, रिधिमा पंडित व करण नाथ यांनी राकेशचे सांत्‍वन केले आणि त्‍याला शांत होण्‍यास मदत केली. राकेश बापट म्‍हणाला, ''मी लष्‍करी कर्मचा-याचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांनी मला नेहमीच न्‍यायासाठी लढण्‍याची शिकवण दिली आहे. मला लहान गोष्‍टींवरून भांडताना पाहून त्‍यांना आनंद होणार नाही. ते मला नेहमीच सांगायचे की, लढायचे असेल तर देशासाठी लढा.'' नंतर, प्रतीकला त्‍याची चूक समजली आणि त्‍याने राकेशची माफी मागितली. त्‍यानंतर निशांत व प्रतीक देखील त्‍यांच्‍यामधील वादविवादांचे निराकरण करताना दिसले.

बातम्या आणखी आहेत...