आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:ICU मध्ये दाखल आहे राखी सावंतची आई, भाऊ राकेश म्हणाला - पित्ताशयाच्या ट्युमरवर शस्त्रक्रिया शक्य नाही, आता केमोथेरपी केली जाईल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राखीने शो सोडू नये, अशी आईची इच्छा

बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर म्हणून दाखल झालेली राखी सावंत हिची आई जया भेडा आयसीयूमध्ये दाखल आहे. जया यांना पित्ताशयामध्ये ट्युमर आहे. ज्यावर शनिवारी एक ऑपरेशन झाले. या ट्युमरचे रुपांतर आता कर्करोगात झाले आहे. यावर आता सोमवारपासून केमोथेरपी होणार आहे. राखीचा भाऊ राकेश सावंतने आपल्या आईच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

यापूर्वी बिग बॉसच्या फॅमिली विकेण्ड एपिसोडमध्ये राखीच्या आईने तिच्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केला असताना ही बातमी समोर आली होती. त्यावेळीदेखील जया या रुग्णालयातच दाखल होत्या.

राकेश सावंतने टीओआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आमची आई हॉस्पिटलमध्ये आहे. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. तिच्या पित्ताशयामध्ये मोठे ट्यूमर आहे ज्यावर शस्त्रक्रिया शक्य नाही. आता डॉक्टर सोमवारपासून केमोथेरपी सुरू करत आहेत. आम्ही प्रार्थना करत आहोत. की सर्व काही ठीक होईल आणि ती लवकर बरी होईल. "

राखीने शो सोडू नये, अशी आईची इच्छा
जेव्हा राकेशला राखीला याविषयी माहिती आहे की नाही असे विचारले असता त्याने सांगितले की, बिग बॉसच्या निर्मात्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शनिवारी त्याने राखीला आपल्या आईच्या तब्येतीची माहिती दिली आहे. आईची इच्छा आहे की राखीने घरात राहावे आणि शो जिंकूनच बाहेर यावे. आई तिच्या खेळामुळे आनंदी आहे. ऑपरेशनपूर्वी जया यांनी शुक्रवारचा भागही पाहिला. राखीने आपल्या करिअरची सेकंड इनिंग सुरु केली असून ती चांगले खेळत असल्याचा आनंद जया यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...