आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अभिनेता राम कपूरला पितृशोक, अनिल कपूर यांनीच दिली होती ‘अमूल द टेस्ट ऑफ इंडिया’ ही टॅगलाइन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम कपूर यांच्या वडिलांना अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राम कपूर यांचे वडील आणि अभिनेत्री गौतमी कपूर यांचे सासरे अनिल कपूर यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. राम कपूर आणि गौतमी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्या

राम कपूर यांच्या वडिलांना अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. राम यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ‘अमूलने माझ्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. मला तुमची खूप आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री गौतमी कपूर हिनेदेखील आपल्या सास-यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनिल कपूर हे इंडस्ट्रीमध्ये ‘बिली’ या नावाने ओळखले जायचे. ते FCB ULKA जाहिरात कंपनीचे CEO होते. अमूलची टॅग लाईन ‘अमूल द टेस्ट ऑफ इंडिया’ ही देखील अनिल कपूर यांनीच दिली होती.

बातम्या आणखी आहेत...