आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:संपूर्ण कुटुंबियांना हसविण्यासाठी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे ‘राम प्यारे सिर्फ हमारे’!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेत रामची मध्यवर्ती भूमिका लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेता निखिल खुराणा साकारणार आहे.

देशभरात पसरलेल्या कोविद-19 विषाणूच्या साथीमुळे सध्या वातावरणात अनिश्चितता आणि निराशेचे सावट आले असून त्यामुळे प्रेक्षकांची मन:स्थिती सुधारून त्यांना हसविण्याची आणि त्याद्वारे मनावरील ताण हलका करण्याची गरज असल्याचे झी टीव्हीने ओळखले आहे. त्यामुळेच आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना झी टीव्हीने आपली पहिलीच नवी मालिका सादर केली आहे.

‘राम प्यारे सिर्फ हमारे’ या विनोदी मालिकेचे कथानक भोपाळमध्ये घडते. ही कथा दुलारी ही तरुणी आणि तिचा आवडता पती राम यांच्याभोवती फिरते. आपला पती हा आपल्या आजूबाजूला राहणार्‍्या सर्वच स्त्रियांना हवाहवासा वाटणारा पुरुष आहे, याची पक्की जाणीव दुलारीला असते. पण तो पती म्हणून आपल्याला लाभला, याबद्दल ती स्वत:ला भाग्यवान समजत असते. तो इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ नये, म्हणून ती नेहमीच दक्ष असते आणि त्यासाठी त्याला या बायकांपासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय योजत असते.

दुलारी स्वत: सुंदर आणि स्मार्ट तरुणी असते. त्यामुळे रामच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची भुरळ अन्य स्त्रियांवर कशी पडते, त्याकडे तिचे बारीक लक्ष असते. राम आणि दुलारी या आदर्श प्रेमीयुगुलाच्या सुखी जीवनात मिठाचा खडा टाकणा-या व्यक्तिरेखेचे नाव कोयल असून ती त्यांची शेजारीण असते. कोयलही दिसायला रूपवान असून ती चटपटीत आणि हुशारही असते. कोयलची ही व्यक्तिरेखा शमीन मन्नन ही सौंदर्यवती अभिनेत्री साकारणार आहे.

मालिकेत रामची मध्यवर्ती भूमिका लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेता निखिल खुराणा साकारणार आहे. मूळ चंदिगडचा असलेला निखिल रामची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याची पत्नी दुलारीची व्यक्तिरेखा ज्योती शर्मा रंगविणार आहे. ज्योतीने यापूर्वी ‘झी टीव्ही’च्या ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’ या लोकप्रिय मालिकेत नायिकेची भूमिका साकारली होती.