आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव:लोकांकडून मिळणा-या सकारात्मक प्रतिसादामुळे आनंदी आहेत कलाकार, अरुण गोविल म्हणाले - 'लोक म्हणतात राम तुमच्यासारखेच दिसत असतील'

उमेश कुमार उपाध्याय. मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देवासमान पूज्यनीय मानायचे.

आजपासून तीन दशकांपूर्वी देशातील पहिली धार्मिक मालिका ‘रामायण’चे पहिल्यांदाच प्रसारण झाले होते, त्यावेळी त्याची लोकप्रियता इतकी होती की, प्रेक्षक टीव्हीसमोरून उठायचेच नाहीत, असे वाटायचे की बाहेर कर्फ्यू लागला आहे. एवढेच नाही तर त्या काळात लोक मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देवासमान पूज्यनीय मानायचे. आज 33 वर्षांनतर ही मालिका पुन्हा प्रसारित होत आहे, तर या मालिकेबाबत आणि यातील पात्रांना कशा प्रकाराच्या प्रतिक्रिया मिळत आहेत हे जाणून घेऊया यातील कलाकारांकडून...

  • तरुण पिढीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे मोठी गोष्ट आहे : सुनील लहरी
लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते
लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते

खूपच सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या मालिकेला जुनी पिढीच नव्हे तर तरुण पिढीचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडस्ट्रीकडून अद्यापदेखील कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही, परंतु इंडस्ट्रीच्या बाहेर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया मिळत आहेत. आम्ही रामायणाच्या पात्रांबाबत वाचले, लिहिले, ऐकले आणि कल्पना केली होती, अगदी तुम्ही तसेच आहात अशी प्रतिक्रिया मिळणे कोणत्याही कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना ही मालिका पूर्वीही आवडायची, आजही आवडतेय आणि विश्वास आहे की, यापुढेही आवडेल. पूर्वी चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे मालिका नियमित पाहू शकत नव्हतो. आता मी ही मालिका पाहू शकतो. मला आठवते की, मी या मालिकेत किती शुद्ध हिंदी बोललो आहे. खरंतर मी एवढी शुद्ध हिंदी बोलतच नाही. मी आपले संवाद मागवून घ्यायचो आणि खोलीत बसून रिहर्सल करायचो, ही गोष्ट आजपर्यंत मी कुणालाच सांगितली नाही.

  • लोक म्हणतात राम तुमच्यासारखेच दिसत असतील : अरुण गोविल
रामाची भूमिका साकारणारे अभिनेते
रामाची भूमिका साकारणारे अभिनेते

‘पूर्वी जशा प्रतिक्रिया यायच्या तशाच आजही खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मालिकेचे चांगले लेखन, कलाकार आणि चित्रीकरणामुळे आज 33 वर्षांनंतरदेखील ‘रामायण’ लोकांना तेवढेच आवडत आहे. सध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरेच फोन आणि एसएमएस येतात. आम्ही रामाला पाहिले नाही, जर पाहिले असते तर ते तुमच्यासारखेच असेत असे काही लोकांचे म्हणणे आहे. मी प्रत्येक भाग कुटुंबासोबत बसून पाहतोय. त्याच्याशी संबंधित गोष्टी सांगतो. त्यावेळी चित्रीकरण करणे खूप अवघड होते.

  • उशीरा उठणारी मुलेदेखील 9 वाजता उठून जातात : दीपिका चिखलिया
सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री
सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री

या मालिकेसाठी लोक वेडे झाले आहेत. त्यांचा एक जरी भाग चुकला तर खूप वाईट वाटत आहे असे मला मेसेज करून सांगत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, ही मालिका पाहून मन हेलावून गेले आहे. 11 वाजता झोपेतून उठणारी मुले देखील आता सकाळी लवकर उठून मालिका पाहतात. आता त्यांना उठवायची गरज नाही. प्रत्येकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. अजूनही आठवतयं, ज्यावेळी आम्ही वनवासात जातानाचे दृश्य चित्रीत करत होतो तर खरंच पायाला फोडं आली होती.

बातम्या आणखी आहेत...