आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • 'Ramayana' And 'Mahabharata' Made Doordarshan The Number One Channel, Other Channels Started Broadcasting Popular Shows Again To Compete In TRP Ratings

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीआरपी रिपोर्ट:'रामायण' आणि 'महाभारत'ने दूरदर्शनला बनवले नंबर वन चॅनल, टीआरपी रेटिंग्जच्या स्पर्धेत इतर चॅनलने सुरु केले लोकप्रिय कार्यक्रमांचे पुनर्प्रक्षेपण  

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'सीआयडी', 'हम पांच', 'खिचडी' आणि 'ऑफिस ऑफिस'सारखे कार्यक्रमही टीआरपीच्या शर्यतीत उतरले आहेत.

लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रमांचे शूटिंग थांबविण्यात आले आहे, दूरदर्शनने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'रामायण' आणि 'महाभारत' या पौराणिक मालिका पुन्हा सुरु केल्या. हा निर्णय यशस्वी ठरला. दोन्ही मालिकांनी नुकत्याच आलेल्या टीआरपी रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. हे लक्षात घेता आता अन्य वाहिन्यांनीही त्यांचे जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 'सीआयडी', 'हम पांच', 'खिचडी' आणि 'ऑफिस ऑफिस'सारखे कार्यक्रमही टीआरपीच्या शर्यतीत उतरले आहेत.

 • दूरदर्शन ठरले सर्वाधिक टीआरपी मिळवणारे चॅनल

लॉकडाऊनपूर्वी दूरदर्शन टॉप 5 वाहिन्यांच्या यादीमध्येसुद्धा नव्हते, परंतु ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा सुरु झाल्यानंतर आता ते पहिल्या क्रमांकाचे चॅनल बनले आहे. जुन्या कार्यक्रमांचे जबरदस्त पुनरागमन पाहून, दूरदर्शनने त्यांचे नवीन चॅनल डीडी रेट्रो या नावाने 12 एप्रिल रोजी लाँच केले आहे. ज्यावर आता फक्त जुने लोकप्रिय कार्यक्रम दाखवले जातील.

बीएआरसीच्या अहवालानुसार दूरदर्शन हे सर्वाधिक टीआरपी मिळवणारे चॅनल आहे.
बीएआरसीच्या अहवालानुसार दूरदर्शन हे सर्वाधिक टीआरपी मिळवणारे चॅनल आहे.
 • सोनी आणि कलर्सवरही लोकप्रिय कार्यक्रमांचे पुनर्प्रक्षेपण

अलीकडेच कलर्स वाहिनीने 2008ची त्यांची गाजलेली मालिका 'बालिका वधू' सुरु केली आहे. याशिवाय सुपरनॅचलर थीमवर आधारित 'नागिन' ही मालिकासुद्धा सुरुवातीपासून दाखविली जाणार आहे. या मालिकेने टीआरपी रेटिंग चार्टमध्ये दीर्घकाळ पहिले स्थान मिळवले होते. तर दुसरीकडे सोनी चॅनलने 'आहट' आणि 'सीआयडी' हे लोकप्रिय कार्यक्रम सुरु केले आहेत.  

टॉप 5 शो मध्ये तीन जुने शो.
टॉप 5 शो मध्ये तीन जुने शो.

हे लोकप्रिय शो परतले 

 • ऑफिस ऑफिस

चॅनल - सब टीव्ही
वेळ - सोम - शुक्र, सायंकाळी 6 आणि रात्री 10 वाजता 

 • बालिका वधू

चॅनल - कलर्स
वेळ - सोम - शुक्र, संध्याकाळी 6 वाजता

 • आहट

चॅनल - सोनी टीव्ही
वेळ - सोम - शुक्र, दुपारी 12 वाजता

 • सारा भाई VS साराभाई

चॅनल - स्टार इंडिया
वेळ - सोम-शुक्र, सकाळी 10 वाजता

 • खिचडी

चॅनल - स्टार भारत
वेळ - सकाळी 11 वाजता

 • हम पांच

चॅनल - झी टीव्ही
वेळ - दररोज दुपारी 12 वाजता 

बातम्या आणखी आहेत...