आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रामानंद सागर यांच्या 80 च्या दशकातील गाजलेल्या 'रामायण' आणि 'महाभारत' या पौराणिक मालिका लॉकडाऊनच्या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्या होत्या. दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. दरम्यान इतर अनेक वाहिन्यांनीही त्यांच्या जुन्या मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रसारित केल्या. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही जुन्या मालिकांबद्दल सांगतोय, ज्या लॉकडाऊन दरम्यान हिट ठरल्या होत्या.
रामायण या मालिकेने जगभरात बघितली गेलेली मालिका म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे डीडी नॅशनलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन सांगितले होते. ‘रामायण’च्या पुनःप्रक्षेपणाने जगभरातील व्युअरशिपचा विक्रम मोडला होता. 16 एप्रिल 2020 रोजी ही मालिका 7.7 कोटी प्रेक्षकांनी बघितली होती. एवढी व्युअरशिप मिळवणारी ही पहिली मालिका ठरली होती.
‘महाभारत’ ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्यानंतर या मालिकेतील पंकज धीर, मुकेश खन्ना, पुनीत इस्सर, गजेंद्र चौहान ेहे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले होते. ही मालिका BARC चार्टवर अनेकदा नंबर 1 स्थानावर राहिली होती.
BARC च्या अहवालानुसार रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' या मालिकेने सलग अनेक आठवड्यांपर्यंत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. दूरदर्शन वाहिनीवर ही मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या संख्येत 40,000 टक्क्यांनी वाढ झाली होती.
नॉन प्राइम टाइम स्लॉटवर सुरु झालेली शाहरुख खानची 'सर्कस' ही मालिका लॉकडाऊनमध्ये बर्यापैकी लोकप्रिय झाली होती. या शोची लोकप्रियता पाहून दूरदर्शन वाहिनीच्या जाहिरातींचे उत्पन्नही लक्षणीय वाढले होते. चॅनेलला बर्याच जाहिराती टाळाव्या लागल्या होत्या.
व्योमकेश बक्षीची भूमिका साकारणारे अभिनेते रजित कपूर यांनी सांगितल्यानुसार, ही मालिका अनेकदा टेलिकास्ट झाली होती. मात्र लॉकडाऊनमधील त्याची लोकप्रियता बदलली. नव्या पिढीनेही या कार्यक्रमाला आपले प्रेम दिले आणि शो परत आल्यामुळे सोशल मीडियावर बर्याच चर्चा रंगल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.