आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:'रामायण'मध्ये 'सुग्रीव'ची भूमिका साकारणारे श्याम सुंदर कालानी यांचे निधन, लॉकडाऊनमुळे 10 दिवसानंतर इंडस्ट्रीला बातमी मिळाली

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्याम सुंदर कालानी यांनी 'रामायण'मध्ये सुग्रीवसोबतच बालीची भूमिका वठवली होती.  - Divya Marathi
श्याम सुंदर कालानी यांनी 'रामायण'मध्ये सुग्रीवसोबतच बालीची भूमिका वठवली होती. 
  • श्याम सुंदर कालानी यांनी 29 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' (1987) मध्ये बाली आणि सुग्रीवाची भूमिका साकारणारे अभिनेते श्याम सुंदर कालानी आता या जगात नाहीत. दहा दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पण लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीत ही बातमी आता पोहोचली आहे. एका वृत्तपत्राने कालानी यांचे भाचे कमल मदनानी यांच्या हवाल्यानुसार लिहिले की, त्यांनी 29 मार्च (रविवारी) रोजी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. कालानी हरियाणाच्या पिंजोर येथील कालका हाऊसिंग बोर्ड कॉलनीत वास्तव्याला होते. 

  • 'राम' आणि 'लक्ष्मण' यांनी व्यक्त केला शोक

'रामायण'मध्ये रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहिरी यांनी कालानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण गोविल यांनी लिहिले, "रामानंद सागर यांच्या रामायणात सुग्रीवाची भूमिका बजावणा-या श्याम सुंदर यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. एक अतिशय चांगली व्यक्ती होते. त्यांचा आत्म्याला शांती मिळो."

सुनील लहिरी यांनी कलानी यांना श्रद्धांजली देताना लिहिले की, “रामायणात सुग्रीव आणि बालीची भूमिका साकारणारे आमचे सहकारी श्याम कालानी यांच्या निधनाबद्दल ऐकून फार वाईट वाटले. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."

  • कालानींबद्दल चुकीचे तथ्य व्हायरल झाले होते

बर्‍याच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला होता की, कालानी यांनी बी. आर. चोप्रांच्या महाभारतात भीमाची भूमिका केली होती. हे वृत्त चुकीचे होते. 'महाभारत' मध्ये कुंतीचा मुलगा गदाधारी भीमाची भूमिका अभिनेते प्रवीणकुमार सोबती यांनी साकारली होती. 72 वर्षीय प्रवीण हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत आणि भाजपचे नेते आहेत. प्रवीण एथलीटही राहिले आहेत त्यांनी एशियन गेम्समध्ये दोन सुवर्णांसह चार पदके आपल्या नावी केले आहेत. ते दोनदा ऑलिम्पिकमध्येही गेले आहेत.

प्रवीण कुमार यांनी 2013 मध्ये आम आदमी पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणाची सुरूवात केली. तथापि, त्यानंतर लवकरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवीण कुमार यांनी 2013 मध्ये आम आदमी पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणाची सुरूवात केली. तथापि, त्यानंतर लवकरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बातम्या आणखी आहेत...