आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:दीपिका चिखलिया यांनी केले 'रामायण'च्या सुग्रीव अर्थातच श्याम सुंदर कालानींचे स्मरण, म्हणाल्या - ते स्वत:चे संवाद बोलत नव्हते 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेत कालानी स्वतःचे संवाद स्वतः बोलत नव्हते तर ते डब केले जात होते.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत सुग्रीव आणि बालीची भूमिका साकारणारे अभिनेते श्याम सुंदर कालानी यांचे अलीकडेच निधन झाले. एका मुलाखतीत या मालिकेत सीतेची भूमिका वठवणा-या दीपिका चिखलिया यांनी कालानींचे स्मरण केले. त्यांनी सांगितल्यनुसार, मालिकेत कालानी स्वतःचे संवाद स्वतः बोलत नव्हते तर ते डब केले जात होते.

  • 'श्यामजी अधिकाधिक वेळ मास्कमध्ये राहत असत'

दीपिका सांगतात, "रामायणचा सेट पुरुषप्रधान होता. सेटवर मी एकटी अभिनेत्री असायचे, त्यामुळे माझा बहुतेक वेळ सागर कुटुंब आणि त्यांच्या सुनांच्या सहवासात जात असे. माझी जास्त चर्चा ही दारा सिंग यांच्याशी होते असे. श्यामजी जास्तीत जास्त वेळ मास्कमध्ये असायचे. इतकेच नाही तर ते स्वत: चे संवाददेखील स्वतः बोलत नव्हते. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे, त्यांना पडद्यावर उपस्थित राहण्यास सांगितले जायचे आणि म्हटले जायचे की, तुमच्या लाइन्स नंतर डब करुयात, सध्या फक्त लिपसिंग करा."

  • डाएटसोबत जुळवून घ्यावे लागायचे

दीपिका यांच्या म्हणण्यानुसार कालानी यांना सेटवर त्यांच्या डाएटबरोबर बरेच अ‍ॅडजस्ट करावे लागायचे. त्या सांगतात, "अनेकदा मी त्यांच्या  बोलण्याच्या पद्धतीने चकित व्हायचे. ते म्हणायचे की मला एवढी अंडी, इतके दूध हवे आहे. 'रामायण'च्या सेटवर अंडी खाण्याची परवानगी नव्हती आणि शेवटी श्यामजींना त्यांचा आहार अॅडजस्ट करावा लागायचा."

दीपिका म्हणाल्या, "मला त्यांची भाषा समजत नव्हती. त्यामुळे आमचे फारसे बोलणे होत नव्हते. परंतु मला ठाऊक आहे की, ते एक सभ्य पुरुष होते. त्यांच्या कुटुंबीयांचे मी मनापासून सांत्वन करते."

  • 29 मार्च रोजी निधन झाले

एका वृत्तपत्राला कालानी यांचे भाचे कमल मदनानी यांना दिलेल्या माहितीनुसार, कालानी यांनी 29 मार्च (रविवारी) रोजी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. कालानी हरियाणाच्या पिंजोर येथील कालका हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहत होते. लॉकडाऊनमुळे, त्यांच्या निधनाच्या 10 दिवसांनंतर ही बातमी इंडस्ट्रीला मिळाली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मालिकेत रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहिरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...