आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायणातील निषाद काळाच्या पडद्याआड:अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन, दीर्घकाळापासून होते आजारी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिका चिखलिया यांनी चंद्रकांत यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामाचे मित्र निषाद राज यांची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. 72 वर्षीय चंद्रकांत गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भीलडी या गावाचे रहिवासी होते. चंद्रकांत यांच्या निधनाची बातमी रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणा-या दीपिका चिखलिया यांनी दिली आहे. दीपिका यांनी दिवंगत अभिनेते चंद्रकांत यांचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दीपिका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- 'तुमच्या आत्म्याला शांती लाभो चंद्रकांत पंड्या, रामायणातील निषाद राज'.

अमजद खान यांचे मित्र होते चंद्रकांत
चंद्रकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी प्रमुख चित्रपट म्हणजे 'प्रेम लग्न', 'प्यार हो गया', 'परिवार ना पंख' आणि 'होते होते प्यार होगा'. 2017 मध्ये रिलीज झालेला गुजराती चित्रपट 'समय चक्र' याचादेखील त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये समावेश होतो. त्यांना पहिली संधी 'कडू मकरानी' या गुजराती चित्रपटाद्वारे मिळाली होती. चंद्रकांत हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमजद खान यांचे खूप चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते.

चंद्रकांत यांना लहानपणापासूनच नाटकांमध्ये आणि अभिनयात खूप रस होता. त्याकाळी त्यांना उपेंद्र त्रिवेदी आणि अरविंद त्रिवेदी यांच्यासोबत नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा अभिनय प्रवास सुरु झाला होता.

बातम्या आणखी आहेत...