आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारेगमप लिटिल चॅम्प्स:धाकटे भाऊ ऋषी कपूर यांच्या आठवणींनी रणधीर कपूर गहिवरुन गेले, म्हणाले, 'बॉबी बघून मी पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो '

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालस्पर्धकांसह सर्व परीक्षकांनीही ऋषी कपूर यांना आदरांजली वाहिली.

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमातील बालस्पर्धकांच्या अफलातून आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या येत्या वीकेण्डच्या भागात ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर हे सहभागी होणार आहेत. या भागात बालस्पर्धक आपल्या अप्रतिम आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतीलच, पण त्यात रणधीर कपूर काही रंजक गुपिते उघड करणार असून त्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसेल.

आता टॉप-7 बालस्पर्धकांनी सादर केलेल्या विविध गाण्यांनी रणधीर कपूर यांना भारावून टाकले असले, तरी ऋषी कपूरच्या ‘खेल खेल में’ चित्रपटातील माधव अरोरा आणि रनिता यांनी गायलेल्या ‘हमने तुमको देखा’ या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी रणधीर कपूर यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. आपल्या या लाडक्या दिवंगत भावाबद्दल बोलताना रणधीर कपूर म्हणाले, “चिंटू हा खरंच एक महान कलाकार होता. मला त्याचे काम पाहून खूपच आनंद होत असे. प्रत्येक प्रसंग मनापासून आणि वास्तव उभा करण्यासाठी तो घेतलेली मेहनत आपल्याला दिसून येते. कोणत्याही अभिनेत्याने तसंच असले पाहिजे. त्याचे त्याच्या कामावर अतिशय प्रेम होते. म्हणूनच आपणही त्याच्या आणि त्याच्या चित्रपटांच्या प्रेमात पडतो. माझ्याप्रमाणेच त्याचे जवळचे मित्र जितेंद्र, राकेश रोशन आणि प्रेम चोप्रा यांनाही त्याची आठवण सतत येत असेल, याची मला खात्री आहे.”

ऋषी कपूर यांनी अभिनय केलेला कोणता चित्रपट सर्वाधिक आवडतो, या प्रश्नावर रणधीर कपूर म्हणाले, “मला त्याचा बॉबी चित्रपट सर्वात आवडतो. मी जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहतो, तेव्हा तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडतो. ऋषीने आ अब लौट चले या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यावेळी तो मनातून खूपच धास्तावला होता. पण मला आणि ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्या सर्वांना हा चित्रपट खूपच आवडला. चिंटू हा माझ्या दृष्टीने भावापेक्षा माझा मित्र अधिक होता. आमचे खास नाते होते. त्याने अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन करावे, असे मला वाटायचे, पण आता बहुदा तो तिथे (स्वर्गात) काहीतरी करीत असेल.”

या भागात रणधीर कपूर हे अनेक अज्ञात किस्से, आठवणी सांगताना आपल्या दिवंगत भावाच्या आठवणींनी भावनावश झाले. यावेळी बालस्पर्धकांसह सर्व परीक्षकांनीही ऋषी कपूर यांना आदरांजली वाहिली. तनिष्का सरकारने 'डफलीवाले' हे गाणे अफलातून पध्दतीने सादर केले, तर झैद अलीने गायलेल्या 'है अगर दुष्मन' या कव्वालीने सर्वांची मने काबीज केली.

बातम्या आणखी आहेत...