आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आठवणींना उजाळा:सुशांतची आठवण काढून इमोशनल झाली रश्मी देसाई, म्हणाली - हे माझे वैयक्तिक नुकसान, एकेकाळी मी त्याच्या अतिशय जवळ होती 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रश्मी देसाई म्हणाली, इंडस्ट्रीने खूप चांगली प्रतिभा गमावली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे चाहते तीन आठवड्यांनंतरही त्याच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले नाहीत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा समावेश आहे, जी सुशांतला खूप चांगला मित्र मानायची. तिच्या मते सुशांतचे नसणे हे तिचे वैयक्तिक नुकसान आहे. पण ती त्याच्याविषयी चर्चा करु इच्छित नाही, कारण सुशांत तिच्यासाठी एखादा विषय नव्हता. एका मुलाखतीत सुशांतविषयी बोलताना रश्मी भावूक झाली.

  • 'वास्तविकता हा जगाने निर्माण केलेला भ्रम आहे'

ई-टाईम्सशी बोलताना रश्मी म्हणाली - वास्तविकता हा एक भ्रम आहे, जो जगाने तयार केला आहे. मी एकेकाळी सुशांतच्या खूप जवळ होते. पण हळू हळू संपर्क तुटला. तो त्याच्या बॉलिवूडच्या कामात तर मी माझ्या शोमध्ये व्यस्त झाले.

तो आयुष्यात खूप चांगले करत होता. आम्हाला त्याचा अभिमान आहे. तो एखादा विषय नव्हता, की ज्या विषयावर बोलू किंवा चर्चा करू. कारण त्याच्यावर माझं जे प्रेम होते, त्यावर मी चर्चा करायला मला आवडत नाही. हे माझ्यासाठी खूप मोठे नुकसान आहे.

  • 'इंडस्ट्रीने खूप चांगले टॅलेंट गमावले'

सुशांतच्या आठवणींनी भावूक झालेली रश्मी पुढे म्हणाली - तो निघून गेल्यानंतर आता लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत. तो एक अतिशय चांगला माणूस आणि एक अतिशय सक्षम अभिनेता होता. इंडस्ट्रीने खूप चांगली प्रतिभा गमावली. प्रत्येक सुंदर दिसणारी व्यक्ती हीरो मटेरियल नसतो. प्रत्येकजण हुशार नसतो. पण सुशांतकडे या दोन्ही गोष्टी होत्या. पण वेळेने दगा दिला. हे इंडस्ट्रीचे नुकसान आहे.

  • सुशांतने टीव्ही अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती

सुशांतने टीव्ही अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 'किस देश में है मेरा दिल' पासून केली होती. दुसरा टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' (2019) द्वारे त्याला ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. यानंतर 2013 मध्ये 'काय पो छे' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'एम.एस. धोनी: अनटोल्ड स्टोरी आणि 'छिछोरे' सारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडली.

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. त्याचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' येत्या 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

0