आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मीचे लेटेस्ट फोटोशूट:रश्मी देसाईने स्लिट ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहत्यांनी केले रश्मीचे कौतुक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती अनेकदा सोशल मीडियावर स्वतःबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. आता अलीकडेच रश्मीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी रश्मीने स्ट्रेपलेस हाय स्लिट ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. यात रश्मी कॅमेर्‍यासमोर सिझलिंग स्टाईलमध्ये पोज देताना दिसतेय. जे पाहून सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वच तिचे कौतुक करत आहेत. तिची ही ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.

चाहत्यांनी केले रश्मीचे कौतुक

रश्मीच्या चाहत्यांना तिची स्टाइल खूप आवडली आहे. एका चाहत्याने कमेंट करत, 'तू खूप सुंदर दिसतेय,' असे लिहिले. तर आणखी एका चाहत्याने, 'हॉट आणि फॅब्युलस' अशी कमेंट केली आहे. एका व्यक्तीने रश्मीचे कौतुक करताना, 'तू खूप विलक्षण, अतिशय सुंदर आणि अत्यंत आकर्षक आनंदी महिला आहेस. मी नेहमीच तुझा चाहता आहे,' असे म्हटले आहे.

दुसरीकडे, रश्मीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिच्या अफेअरचे किस्से अनेकदा मीडियासमोर आले आहेत. रश्मी 'उतरन' या मालिकेत काम करत होती तेव्हा तिने तिचा को-स्टार नंदिश संधीसोबत लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. आणि दोघांचा घटस्फोट झाला. रश्मीने टीव्ही मालिकांसह बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...