आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'द कपिल शर्मा शो':विनोदवीर कपिल शर्माच्या शोच्या पहिल्या भागात 'रिअल हीरो' सोनू सूदची एंट्री, शेअर करणार खास अनुभव

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊननंतर या आठवड्यात या शोचा पहिला भाग प्रसारित होणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा रिअल हीरो सोनू सूद लवकरच छोट्या पडद्यावर आपले अनुभव शेअर करताना दिसणार आहे. विनोदवीर कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोच्या पहिल्या भागात सोनू हजेरी लावणार आहे. लॉकडाऊननंतर या आठवड्यात या शोचा पहिला भाग प्रसारित होणार आहे.

सध्या या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोमध्ये सोनू सूदने गरजुंना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी कशी मदत केली. या कार्यात त्याला कोणते अडथळे आले याचे अनुभव तो सांगणार आहे.

विशेष म्हणजे देशातील नागरिकांना मदत केल्यानंतर सोनूने त्याचा मोर्चा विदेशात अडकलेल्या लोकांकडे वळविला आहे. याशिवाय प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अॅप लाँच केले आहे. ‘प्रवासी रोजगार’ असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देईल.

0