आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय शोज्पैकी एक असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून आता अभिनेत्री रेहना पंडितची एंट्री होणार आहे. रेहना आता शिखा सिंगच्या जागी आलियाची भूमिका साकारताना दिसणआर आहे. गेल्या सहा वर्षांपासून शिखा सिंग अभिची (शब्बीर आहलुवालिया) बहीण आलिया ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारत होती, पण काही कारणास्तव तिने या मालिकेला रामराम ठोकला आहे. आता रेहना ही भूमिका वठवणार आहे.
झी टीव्हीवरील मनमोहिनीमध्ये आपली शेवटची भूमिका साकारलेल्या रेहनाने ‘कुमकुम भाग्य’साठी चित्रीकरणाला सुरूवातही केली आहे. रेहना म्हणाली, “भारतीय टेलिव्हिजनवरील टॉप रेटेड मालिकांपैकी एक असलेल्या ‘कुमकुम भाग्य’चा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे. आलियाची शक्तीशाली भूमिका साकारणे आव्हानात्मक असेल पण मी त्याबद्दल उत्साहात आहे. शिखाने ही भूमिका गेली काही वर्षे छान साकारली आणि मला आशा आहे की या शोचे चाहते मलाही तिच्याचप्रमाणे या भूमिकेत स्वीकारतील आणि मलाही तेवढेच प्रेम देतील.”
रेहना पुढे म्हणाली, “आलियाच्या भूमिकेला अनेक स्तर आणि छटा आहेत. मी चित्रीकरणाला सुरूवात केली असून सेटवर परतताना मला खूप आनंद होत आहे. सेटवर आता अनेक बदल घडले असून सुरक्षेची खूप काळजी घेतली जात आहे. पण आता हे नवीन नॉर्मल असून सध्याच्या कठीण परिस्थितीत अगदी गरजेचे आहे. या शोसाठी मी माझे सर्वोत्तम देईन आणि 13 जुलैपासून ह्या शोमध्ये नवीन टि्वस्ट सर्वांनी पाहावेत यासाठी मी उत्सुक आहे.”
आलियाच्या व्यक्तिरेखेमध्ये नव्या चेहऱ्यासह मालिकेत रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चाफेकर) यांच्या आयुष्यातही नवीन घडामोडी होतील. लॉकडाऊनच्या आधीच्या भागांमध्ये पाहायला मिळाले की रणबीरने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्राची त्याच्यापासून लांब राहू लागली आहे, पण खरंतर मनातून तिचेही त्याच्यावर प्रेम आहे. त्याचे लग्न मायाशी ठरले आहे. पण मॉलमध्ये रणबीर आणि प्राची यांची केमिस्ट्री त्याची आजी दलजीत आणि आई पल्लवी पाहतात, काय त्या मायासोबतची त्याची एंगेजमेंट वेळेत थांबवतील? नवीन एपिसोड्समध्ये आणखी नाट्यमय वळणे पाहायला मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.