आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरग्रीन रेखा छोट्या पडद्यावर:'गुम है किसी के प्यार मे'मध्ये अभिनेत्री रेखा यांची एंट्री, मालिकेत येणार ट्विस्ट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गुम है किसी के प्यार में'च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील विराट आणि सई यांची प्रेम कहाणी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आणि पुढे येणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना आगामी महासप्ताहासाठी अधिक उत्साहित केले आहे.

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा 'गुम है किसी के प्यार में' सोबत आधीपासूनच जोडल्या गेल्या आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमधील त्यांची जादुई उपस्थिति, चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आणि यासोबतच या शोमध्ये एक रोमांचक डेवलपमेंट पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, "रेखाजींची दुसऱ्या प्रोमोच्या चित्रीकरणानंतर या शो मध्ये एखादी विशेष एण्ट्री देखील असू शकेल. रेखाजींच्या प्रोमोजना मिळणाऱ्या प्रतिक्रिया अद्भुत आहेत आणि स्क्रिप्टमध्ये इतके ट्विस्ट आहेत की निर्माता या महासप्ताहाला मोठे यश मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.”

'गुम है किसी के प्यार में'च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. सई आणि विराटबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. काय सम्राटच्या पुन्हा एंट्रीने त्यांच्या प्रेम कहाणीला वेग येईल? काय विराट कधीच सईबाबतच्या आपल्या भावना कधीच कबूल नाही करणार? हे मालिकेत बघायला मिळतील.

बातम्या आणखी आहेत...