आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 15:प्रोमोत स्पिकींग ट्रीच्या रुपात दिसणार रेखा, सलमान खानने दिले 'विश्वसुन ट्री' असे नाव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोमोत रेखा झाडासाठी व्हाइस ओव्हर करताना दिसणार

कलर्स वाहिनीवरील बहुप्रतिक्षित बिग बॉस 15 या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकेच नाही तर यंदाचे पर्व खूपच खास असणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माते लोकप्रिय आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना सहभागी करून घेणार आहेत. इतकेच नाही तर रेखा यांच्याकडे निर्माते महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहेत. रेखा बिग बॉसमध्ये ट्री ऑफ फॉर्च्यूनच्या रुपात येणार आहेत. स्वतः रेखा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हा प्रोमो सोमवारपर्यंत प्रसारित केला जाणार आहे.

प्रोमोत रेखा झाडासाठी व्हाइस ओव्हर करताना दिसणार
प्रोमोत सलमान खान जंगलात फिरताना दिसेल. अचानक त्याला झाडातून एक आवाज ऐकू येईल. त्या झाडाला सलमानने विश्वसून ट्री असे नाव दिले आहे. तो या झाडासोबत बोलताना दिसेल. याच झाडासाठी रेखा यांनी आपला आवाज दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा ट्री ऑफ फॉर्च्यून म्हणून कार्यक्रमात सहभागी होतील.

शोसाठी उत्सुक आहेत रेखा
प्रोमोच्या माध्यमातून शोमधील आपल्या सहभागाबद्दल रेखा म्हणाल्या, "बिग बॉस हा एक इंट्रेस्टिंग शो आहे. यात ड्रामा, अॅक्शन, मस्ती आणि रोमांच सर्व काही आहे. हा जीवनाचा क्रॅश कोर्स आहे. बिग बॉस 15 च्या प्रोमोसाठी कलर्ससोबत काम केल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हा एक रोमांचक क्षण आहे. एक नवीन अनुभव आहे, कारण मी 'स्पीकिंग ट्री' साठी आवाज देत आहे, ज्याला सलमानने प्रेमाने 'विश्वसुन ट्री' असे नाव दिले आहे, जे एक जिवंत झाड आहे. हे झाड ज्ञान, आशा आणि विश्वासाचे प्रतीक आहे.'

बातम्या आणखी आहेत...