आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Riddhi Turns 37: Riddhi Dogra Divorced Rakesh Bapat After 8 Years Of Marriage, Fell In Love On The Sets Of TV Show

हॅपी बर्थडे रिद्धी:लग्नाच्या 8 वर्षांनंतर राकेश बापटसोबत रिद्धी डोगराने घेतला होता घटस्फोट, टीव्ही शोच्या सेटवर झाली होती दोघांची पहिली भेट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही शोच्या सेटवर झाली होती राकेश बापटसोबत भेट

अल्ट बालाजी आणि झी5 च्या 'द मॅरिड वुमन' या सीरिजमधून प्रसिद्धी एकवटणारी रिद्धी डोगरा आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रिध्दी ही दिवंगत भाजप नेते अरूण जेटली यांची भाची आहे. अरूण जेटली यांच्या पत्नी रिध्दीची आत्या आहेत. 2007 च्या 'झूमे जिया रे' या शोद्वारे रिद्धीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी', 'लागी तुझसे लगन'सारख्या अनेक लोकप्रिय शोचा भाग आहेत. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी-

अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी रिद्धी लोकप्रिय डान्सर शामक दावर यांच्या डान्स ग्रुपचा भाग होती. यानंतर तिने झूम टीव्हीवर निर्माता म्हणून काम केले आणि होस्टिंगमध्येदेखील आपले नशीब आजमावले. झूमे जिया रे या शोमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती मर्यादा, आखिर कब तक, सावित्री, ये है आशिकी, दिया और बाती हम, वो अपना सा सारख्या अनेक टीव्ही शोचा भाग राहिली आहे.

टीव्ही शोच्या सेटवर झाली होती राकेश बापटसोबत भेट

रिद्धी डोगरा 2010 मध्ये टीव्ही शो 'मर्यादा', 'आखिर कब तक'मध्ये दिसली. 'मर्यादा' या मालिकेच्या सेटवर तिची भेट पहिल्यांदा राकेश बापटसोबत झाली होती. याच काळात चित्रपटांमध्ये यश न मिळाल्याने राकेश छोट्या पडद्याकडे वळला होता. सेटवर एकत्र वेळ घालवताना दोघांची मैत्री झाली. पहिले मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर नंतर 2011 मध्ये ते लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही नच बलिये 6 मध्ये एकत्र दिसले होते. मात्र काही कारणांमुळे 2019 मध्ये ते वेगळे झाले.

8 वर्षांनंतर परस्पर संमतीने घेतला होता घटस्फोट

2019 मध्ये राकेश बापट आणि रिद्धीने घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना मोठा धक्का दिला होता. या जोडप्याने अधिकृत निवेदनात विभक्त झाल्याची माहिती दिली होती.

राकेश आणि शमिता शेट्टी यांच्यातील मैत्रीवर दिली होती प्रतिक्रिया
राकेश आणि रिध्दी जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्यातील मैत्रीचे नाते हे कायम आहे. राकेश जेव्हा ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात होता तेव्हा रिध्दीने त्याला खूप सपोर्ट केला होता. त्याच्यावर आरोप करणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे. एवढेच नाही तर राकेश आणि शमिता यांच्यातील बाँडिंग पाहून रिद्धी म्हणाली होती की, 'जर राकेश या नात्यात आनंदी असेल, तर मी देखील त्याच्यासाठी नक्कीच आनंदी असेन. अर्थात हा त्याचा खासगी प्रश्न आहे. या कार्यक्रमामध्ये राकेशचे असणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचे तिथे असणे मला आवडते. राकेश या कार्यक्रमात प्रेक्षकांना जसा दिसतोय वास्तवातही तो तसाच आहे. जर एखाद्या जागी दोनपेक्षा जास्त लोक असतील तर ती राकेशसाठी गर्दी असते. राकेशला जे सांगायचे असते ते तो कधीच ओरडून सांगत नाही. किंबहुना तो त्याबद्दल फारसा कुणाशीही बोलतही नाही. तो फक्त अशाच व्यक्तिशी बोलतो ज्याच्यावर त्याचा सर्वात जास्त विश्वास असेल.'

बातम्या आणखी आहेत...