आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक मुलाने संधीचे केले सोने:अयोध्येचा ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडल 13'चा विजेता, आईवडिलांची उंचावली मान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’च्या 13 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी (2 एप्रिल) पार पडला. ऋषी सिंह या पर्वाचा विजेता ठरला आहे. देवोस्मिता, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह, सोनाक्षी कर, चिराग कोतवाल या स्पर्धकांना मागे टाकत ऋषी सिंहने विजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले आहे. ऋषीला बक्षिसाच्या रुपात 25 लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार मिळाली आहे. तसेच त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे.

काय म्हणाला ऋषी सिंह?
‘इंडियन आयडॉल 13’चा विजेता घोषित झाल्यानंतर ऋषी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. "आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. विजेत्याचे नाव घोषित झाल्यानंतर मला विश्वासत बसत नव्हता. हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. मी इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे,' या शब्दांत ऋषीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आईवडिलांचा दत्तक मुलगा आहे ऋषी
ऋषी सिंह हा मुळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठात शिकतोय. विशेष म्हणजे ऋषी त्याच्या आईवडिलांचा दत्तक मुलगा आहे. याचा खुलासा स्वतः ऋषीने या शोमध्ये केला होता. दत्तक मुलाने आयुष्याचं सोनं केलं अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी दिली आहे.

या व्हिडिओत पाहा ऋषीचा 'इंडियन आयडॉल 13'चा प्रवास...

नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हा शो जज करत होते. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोला अखेर विजेता मिळाला असून ऋषी सिंहवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.