आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खतरों के खिलाडी मेड इन इंडिया:बिझी शेड्युलमुळे रोहित शेट्टी होस्ट करणार नाही रिअ‍ॅलिटी शो, आता फराह खान सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेकर्सनी फराहपुर्वी वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हालाही केला होता संपर्क

स्टंटवर आधारित रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 10'चा ग्रॅण्ड फिनाले एपिसोड 25 आणि 26 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. त्यानंतर निर्माते 'खतरों के खिलाडी मेड इन इंडिया' नावाने एक मिनी सीरिज आणणार आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी याचे सूत्रसंचालन करणार होता, मात्र आता त्याच्या जागी फराह खान सूत्रसंचालन करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहितने आपल्या आगामी प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे खतरों के खिलाडीसाठी वेळ नव्हता. त्यामुळे निर्मात्यांनी त्याच्या जागी दुस-याला सूत्रसंचालनासाठी घेण्याचे ठरवले. यासाठी आधी वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याशीदेखील संपर्क करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडेही वेळ नसल्याने शेवटी फराह खानला घेण्यात आले आहे. पण सुरुवातीच्या काही भागांमध्ये रोहित दिसणार आहे. या शोसाठी फराहने तयारी सुरु केली आहे. तयारी होताच ती शूटिंग सुरु करणार आहे.