आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमबॅक:5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय अभिनेता रोनित रॉय, 'जुर्म और जज्बात' हा क्राईम बेस्ड शो करणार होस्ट

किरण जैन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोनितने 2018 मध्ये केले होते डिजिटल पदार्पण

अभिनेता रोनित रॉय तब्बल 5 वर्षानंतर छोट्या पडद्यावर परत येतोय. 2016 मध्ये 'अदालत' या शोमध्ये वकील म्हणून दिसलेला रोनित रॉय आता गुन्हेगारीवर आधारित शो होस्ट करताना दिसणार आहे. शोच्या निर्मितीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'जुर्म और जज्बात' या कार्यक्रमासाठी वाहिनी केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरही लोकप्रिय अशा कलाकाराच्या शोधात होती.

ब-याच कलाकारांशी बोलणी झाल्यानंतर शोच्या निर्मात्यांनी रोनित रॉयला शोसाठी होस्ट म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. या गुन्हेगारीवर आधारित शोमध्ये रोनित प्रेक्षकांना अशा विलक्षण कथांची सफर घडवणार आहे, जे अंगावर शहारा आणतील. चॅनेल लवकरच या शोची अधिकृत घोषणा करणार आहे.

रोनितने 2018 मध्ये केले होते डिजिटल पदार्पण
2018 मध्ये, रोनित रॉयने मोना सिंग आणि गुरदीप कोहली यांच्यासह अल्ट बालाजीच्या 'कहने को हमसफर है' मधून डिजिटल पदार्पण केले होते. यानंतर, तो 2019 मध्ये क्राइम थ्रिलर वेब सीरिज 'होस्टजेस' मध्ये दिसला होता. चित्रपटांबद्दल बोलायचे म्हणजे, रोनितने गेल्या काही वर्षांत काबिल, लवयात्री आणि मशीन या चित्रपटांमध्ये काम केले.

बातम्या आणखी आहेत...