आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालकलाकार रुहानिका धवनने मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. तिने घराचे काही फोटो शेअर करत त्यासह भावूक कॅप्शनही लिहिले आहे. नवीन घरात रुहानिका आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी दिसली. आपल्या यशाचे श्रेय ती तिच्या आईवडिलांना देतेय. यापुढे अजून मेहनत करुन सर्व स्वप्ने अशीच हळूहळू पूर्ण करणार असल्याचे ती म्हणाली.
वयाच्या 15 व्या वर्षी घर विकत घेतले
स्टार प्लसची लोकप्रिय टीव्ही मालिका 'ये है मोहब्बतें'मध्ये झळकेल्या रुहानिका धवन उर्फ 'छोट्या रुही'ने आपल्या अभिनयाने घराघरांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच लोकप्रियतेच्या जोरावर आज ती तिची सर्व स्वप्ने पूर्ण करत आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिने मुंबईत स्वतःचा 3 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. तिच्या या घराची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
खूप आनंदी आहेत कुटुंबीय
स्वतःचे नवीन घर पाहून रुहानिका खूपच भावूक झाली. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना देत ती लिहिते, "वाहेगुरुजी आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांसोबत माझा आनंद शेअर करत आहे... नवीन सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझे मन भरुन आले आहे आणि मी अत्यंत आभारी आहे. स्वतःचे घर विकत घेणे हे खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. हे माझ्यासाठी आणि माझ्या लोकांसाठी खूप मोठे आहे. हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी थांबू शकत नाही. सर्व प्लॅटफॉर्मसाठी मी आणि माझे पालक अत्यंत आभारी आहोत आणि मला मिळालेल्या संधीमुळे मला हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली आहे."
आपल्या आईबद्दल बोलताना रुहानिका म्हणाली, "मला माझ्या आईचा विशेष उल्लेख करायचा आहे. ती एक सर्व प्रकारची जादुगार आहे. आई प्रत्येक पैसा वाचवते आणि दुप्पट करते. ती कशी करते हे फक्त देव आणि तिलाच माहित," असे रुहानिका म्हणते.
"ही फक्त सुरुवात आहे. मी आधीच मोठी स्वप्ने पाहात आहे. मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करेन आणि आणखी कठोर परिश्रम करने. त्यामुळे जर मी तरु शकले तर तुम्हीही खूप काही करु शकता. म्हणून स्वप्न पाहा, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा आणि ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल," असे रुहानिका म्हणाली.
रुहानिकाला बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे आहे
रुहानिका म्हणते की, ती आता कितीही उत्साहित असली तरी तिला नवीन घरात शिफ्ट व्हायचे नाही. आता तिला बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करुन चांगले गुण मिळवायचे आहे. रुहानिकानेही तिच्या अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला आहे. सध्या तो फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत व्यस्त आहे.
'ये है मोहब्बतें' मध्ये झळकली होती
रुहानिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'मिसेस कौशिक की पांच बहुएं' या टीव्ही शोमधून केली होती. यामध्ये तिचे पात्र फक्त 10-20 दिवसांचे होते. नंतर ती 'ये है मोहब्बतें'मध्ये झळकली. 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातही ती दिसली होती. याशिवाय सलमान खान स्टारर 'जय हो' या चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.