आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड वॉरियर्सचा सन्मान:सा रे ग म प लिटल चॅम्प्स सूत्रधार मनिष पॉलने कोविड–19 वॉरियर्सचा केला गोल्डन प्लेटसह सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊन हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक नवीन नॉर्मलमध्ये प्रवेश करत आहेत. झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ सीजन 8 पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून हिमेश रेशमिया आणि जावेद अली आता अलका याज्ञिक यांच्यासोबत परीक्षकांच्या रूपात दिसून येणार आहेत. लोकप्रिय अभिनेता आणि सूत्रसंचालक मनीष पॉल सूत्रधार म्हणून या शो चे काम पाहणे सुरू ठेवणार आहे. लॉकडाऊन नंतरचा पहिला एपिसोड खास आहे कारण तो भारतातील अनसंग हीरोज कोविड वॉरियर्सना आदरांजली अर्पण करेल. 

सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या आगामी भागात हिरॉईक डॉक्टर्स, पोलिस अधिकारी आणि ह्या कठीण काळात फक्त माणूसकी म्हणून काही असामान्य कामे केलेल्या सामान्यांवर प्रकाशाचा झोत टाकण्यात येईल. सूत्रधार मनिष पॉलने त्यांच्या ह्या असाधारण योगदानासाठी झी टीव्हीचा सलाम म्हणून ह्या कोविड हीरोज्ना गोल्डन प्लेट देऊन सन्मानित केले.

ह्या खास एपिसोडमध्ये विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या चार व्यक्तींना भेटा आणि कोरोना विषाणूसोबत सुरू असलेल्या ह्या लढ्यामध्ये त्यांच्या वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल जाणून घ्या. 

पहिली कथा आहे विक्रांत ढवळे ह्या ३५ वर्षीय मुंबई पोलिस कॉन्स्टेबल आणि कोविड–१९ सर्वायवर यांची. ह्या साथीमध्ये मुंबई पोलिस सतत ड्यूटीवर आहेत आणि ह्या शहराला व लोकांना सुरक्षित राखण्यासाठी आपल्या आयुष्याची जोखिम पत्करली आहे. लोकांना आपापल्या घरी ठेवण्यासाठी त्यांना विनंती करण्यापासून, त्यांच्या पाया पडण्यापर्यंत ते २४x७ शहरांतील रस्त्यांवर पॅट्रोलिंग करत आहेत. विक्रांत ढवळेलासुद्धा कोविड झाला, त्याने उपचार घेतले आणि पुन्हा एकदा तो आपल्या ड्यूटीवर रूजू झाला. दुसरी गोष्ट आहे प्रेरणादायी जोडी एरिक लोबो आणि मर्लिन लोबो जे लग्ने आणि सोहळे आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करतात. त्यांना त्यांचे स्वतःचे लग्न एकदम जोरदार करायचे होते आणि गेली ८ वर्षे ते त्यासाठी पैशांची बचत करत होते. लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांनी लग्नही केले पण अगदी कमी प्रमाणावर त्यांनी सोहळा केला आणि बाकीचे पैसे कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ५० हॉस्पिटल बेड्स खरेदी करण्यासाठी दान केले. त्यांनी बचत केलेल्या उरलेल्या पैशातून अन्न आणि जरूरी गोष्टींची मदत करत आहेत.

तिसरी गोष्ट आहे कै. डॉ. अनिल बहुलेकर यांची. कोविड झाल्यानंतर डॉ.अनिल यांना देवाज्ञा झाली. त्यांना सा रे ग म प मध्ये ऑडिशन देण्याची इच्छा होती. ते आपले स्वप्न तर पूर्ण करू शकले नाही पण लिटल चॅम्प्स तसेच परीक्षकांनी देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सलाम केला.

शेवटची कथा आहे २३ वर्षीय रोशन भूल्लर चौधरी ह्या रूग्णवाहिनी चालकाची. ह्या साथीच्या सुरूवातीपासूनच तो सातत्याने ड्यूटीवर असून रूग्णांना इस्पितळात पोहोचवण्याचे काम तो अविरतपणे करत आहे. तीन महिन्यांपासून तो आपल्या घरापासून दूर असून तो कधीही ऑफ ड्यूटी नसतो आणि रूग्णांना इस्पितळात पोहोचवताना, पीपीई किटची विल्हेवाट करताना आणि अख्खी रूग्णवाहिका व्यवस्थितपणे सॅनिटाईज करताना खूप काळजी घेतो. असेही दिवस होते जेव्हा त्याने एकही ब्रेक न घेता १८ हूनही जास्त रूग्णांना ट्रांसपोर्ट केले आहे. परीक्षक हिमेश रेशमिया म्हणाले, “आम्ही त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाहीत.”

ह्या प्रेरणादायी कथांव्यतिरिक्त लिटल चॅम्प्स आणि परीक्षकांनी कोविड वॉरियर्ससाठी परफॉर्मही केले. एवढेच नाही तर अतिशय गुणी लिटल चॅम्प्सच्या खास अॅक्ट्ससह प्रेक्षक थक्कही होतील. ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या आगामी भागामध्ये प्रेक्षकांसाठी खूप मेलोडीज, आठवणी आणि सरप्राईजेस आहेत.

बातम्या आणखी आहेत...