आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'Saath Nibhana Saathiya 2' Kokilaben Aka Rupal Patel Is Leaving The Show, The Makers Are Trying To Convince Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाहत्यांसाठी वाईट बातमी:'साथ निभाना साथिया 2' हा कार्यक्रम सोडत आहे कोकिलाबेन उर्फ ​​रूपल पटेल, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नात आहेत निर्माते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुपल यांना फक्त 20 एपिसोड्ससाठी साइन करण्यात आले होते.

छोट्या पडद्यावर अलीकडेच सुरु झालेली साथ निभाना साथिया 2 ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी अलीकडेच 'रसोडे में कौन था' हा संवाद रिक्रिएट करण्यात आला होता, ज्यात कोकिलाबेन उर्फ ​​रूपल पटेल दिसल्या होत्या. पण आता शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे रुपल पटेल लवकरच हा शो सोडणार आहेत.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, रुपल पटेल लवकरच हा शो सोडणार आहेत. रुपल यांना फक्त 20 एपिसोड्ससाठी साइन करण्यात आले होते. नोव्हेंबरच्या मध्यभागी ते पूर्ण होणार आहेत. कोकिलाबेन हे या मालिकेतील एक महत्त्वाचे पात्र आहे, त्यामुळे त्यांचे शोमध्ये नसणे प्रेक्षकांची निराश करू शकते. आता निर्माते त्यांचे पात्र पुढे नेण्याच्या विचारात आहेत.

निर्मात्यांची बोलणी सुरू आहेत

रूपल यांच्या पात्राची लोकप्रियता बघता निर्माते मालिकेच्या कथानकात बदल करण्याच्या विचारात आहेत. रुपल यांनी ही मालिका सोडू नये, यासाठी निर्मात्यांचे त्यांच्याशी देखील बोलणे सुरु आहे. रूपलकडून अद्याप उत्तर आलेले नाही.

'साथ निभाना साथिया 2' पूर्वी रुपल पटेल 'ये रिश्ते हैं प्यार के' या मालिकेत काम करत होत्या. मात्र शोमध्ये व्यस्त असल्यामुळे रुपल यांनी सुरुवातीला या मालिकेत काम करण्यास नकार दिला होता. मात्र ये रिश्ते हैं प्यार के ही मालिका अर्ध्यावरच बंद पडली, त्यामुळे त्या या मालिकेत काम करण्यास तयार झाल्या. मालिकेच्या दुसर्‍या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ही मालिका बीएआरसीच्या टीआरपी चार्टवर तिसर्‍या क्रमांकावर आहे.