आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.यापूर्वीच सलमान खानने मुंबईतील फिल्मसिटी येथे या कार्यक्रमाचा ग्रॅण्ड प्रीमियर शूट केला आहे. ग्रँड प्रीमिअरमध्ये सलमान घरात येणा-या सर्व स्पर्धकांची ओळख करुन देईल. आता शूटिंग सुरू झाली आहे, सेटवरुन काही स्पर्धकांची छायाचित्रेही समोर आली आहेत.
अलीकडेच बिग बॉस खबरी पेजने शोमध्ये सहभागी होत असलेल्या रुबीना दिलैक आणि तिचा नवरा अनुभव शुक्ला यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. छायाचित्रात दोघेही सलमानसोबत स्टेजवर संवाद साधताना दिसत आहेत. या शोमध्ये एन्ट्री घेताना रुबीनाने निळ्या रंगाचा डिझायनर वन शोल्डर गाऊन परिधान केला आहे, तर अनुभवने तिच्या ड्रेसशी मिळताजुळता थ्री पीस सूट घातला आहे.
RubinaDilain and Abhinav shukla On the sets of #BiggBoss14 pic.twitter.com/zeIK2rQ80f
— The Khabri (@TheRealKhabri) October 1, 2020
सलमान खानने शेअर केले सेटवरील पहिले छायाचित्र
टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय होस्ट असलेला सलमान खान पुन्हा एकदा या पर्वात सर्व स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. सलमानने या शोच्या शूटिंगदरम्यानचे एक छायाचित्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. यात तो काळ्या रंगाच्या शर्ट पँटमध्ये मॅचिंग मास्क लावून दिसतोय. खरं तर गेल्या वादग्रस्त पर्वानंतर हा शो होस्ट करणार नसल्याचे सलमानने जाहिर केले होते. मात्र चाहत्यांच्या मागणीवरुन मेकर्सनी त्याची समजूत घालून होकार मिळवला.
View this post on Instagram#BiggBoss14 coming to you this weekend...
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Oct 1, 2020 at 7:19am PDT
जिया मानेकला रिप्लेस करुन आला अनुभव शुक्ला
रुबीना आणि अनुभव यांना गेल्या अनेक पर्वांसाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यांनी होकार दिला नव्हता. बिग बॉस 14 साठी त्यांनी आठवडाभरापूर्वीच होकार दिला आहे. यापूर्वी अनुभव शुक्ला ऐवजी गोपी बहु ऊर्फ जिया मानेक या शोमध्ये सहभागी होणार होती, त्यासाठी तिने तयारीही सुरू केली होती, परंतु जास्त फी मागितल्याने निर्मात्यांने तिला रिप्लेस केले.
शोमध्ये 12 स्पर्धक होणार सहभागी
या कार्यक्रमाशी संबंधित बातम्यांनुसार, 1 ऑक्टोबर रोजी 12 सेलिब्रिटींना बिग बॉसच्या घरात पाठवण्यात आले आहे. याशिवाय बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ हा 13 वा सदस्य असेल. हिना खान आणि गौहर खानदेखील काही दिवस या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.