आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Salman Khan Will Host 'Bigg Boss 14' From Panvel Farmhouse, Not From The Show's Set, Decided To Escape From Corona

बिग बॉस 14 अपडेट:सलमान खान शोच्या सेटवरून नव्हे तर पनवेलच्या फार्महाऊसमधून करणार 'बिग बॉस 14' होस्ट, कोरोनापासून बचावासाठी घेतला निर्णय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोमध्ये असेल लॉकडाऊन कनेक्शन शोमध्ये असेल लॉकडाऊन कनेक्शन

बिग बॉस 13 च्या लोकप्रियतेनंतर आता निर्मात्यांनी त्याच्या पुढच्या सीजनची तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या फॉर्मेटसंबंधातील बातम्या आता समोर येत आहेत. आता बातमी आहे की, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सलमान खान बिग बॉसच्या सेटऐवजी पनवेलच्या फार्महाऊसमधून हा शो होस्ट करणार आहे.

गेल्या सीजनमध्ये सलमान खान प्रत्येक शनिवारी आणि रविवारी स्पर्धकांची समजूत घालताना आणि त्यांना खडे बोल सुनावताना दिसला होता. स्पर्धकांना धक्का देण्यासाठी सलमानने अनेकदा  घराच्या आतही प्रवेश केला होता. आता सलमान यंदा पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसमधून शुटिंग करणार असल्याने आठवड्याच्या शेवटी काही बदल केले जातील. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शूटिंगसाठी दर दर आठवड्याला सलमानकडे एक छोटी टीम पाठविली जाईल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो स्पर्धकांशी संपर्क साधू शकेल. कारण चित्रपटांचे शूटिंग आणि रिलीज बंद असल्याने आठवड्याच्या शेवटी प्रमोशनसाठी येणारे पाहुणे शोमध्ये दिसणार नाहीत.

  • शोमध्ये असेल लॉकडाऊन कनेक्शन 

निर्माते दरवर्षी नव्या फॉर्मेटमध्ये शो घेऊन येतात. सद्यस्थिती लक्षात घेता या वेळी या कार्यक्रमात लॉकडाऊन कनेक्शन बघायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शोचा फॉर्मेट सामाजिक अंतर, आरोग्य आणि लॉकडाऊनशीही संबंधित असेल. बिग बॉस 14 लॉकडाऊन एडिशन आणि बिग बॉस 14 असेल रॉकिंग अशा  टॅगलाइनवर मेकर्स चर्चा करत आहेत. या शोचे शूटिंग सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू होईल. गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला बिग बॉसचा प्रीमियर झाला होता.

  • हे स्पर्धक करु शकतात घरात प्रवेश 

निया शर्मा, विव्हियन दिसेना, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्झा, सुगंधा मिश्रा आणि निखिल चिनप्पा यांची नावे सध्या समोर आली आहेत. दुसरीकडे चाहत खन्ना, तेजस्वी प्रकाश, अध्ययन सुमन, शुभांगी अत्रे या सेलिब्रिटींनी शोमध्ये येण्याची ऑफर नाकारली आहे.

  • सलमान खान सध्या फार्महाऊसमध्ये शेतीत रमतोय 

लॉकडाउन होण्यापूर्वी सलमान खान आपल्या कुटुंबातील काही सदस्य आणि मित्रांसह पनवेल फार्महाऊसमध्ये गेला होता पण नंतर तेथे अडकून पडला. सलमान अजूनही फार्महाऊसमध्ये आहे, तर त्याच्या कुटुंबातील सदस्य मुंबईत परतले आहेत. सध्या सलमान शेतीत मन रमवतोय. शेती करतानाची छायाचित्रे आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर पोस्ट करतोय. 

View this post on Instagram

Rice plantation done . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Jul 20, 2020 at 9:59am PDT