आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभावनाचे छोट्या पडद्यावर पुनरागमन:'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये संभावना सेठची होणार एंट्री, साकारणार महुआची भूमिका

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुप्‍ता कुटुंबाच्‍या जीवनांमध्‍ये विलक्षण हास्‍यजनक कहर निर्माण करण्‍यास संभावना आता सज्‍ज आहे.

बॉलिवुड सेन्‍सेशन, उत्तम अभिनेत्री आणि व्लॉगर संभावना सेठ टे‍लिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे. अँड टीव्‍हीवरील 'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये ती एंट्री करत आहे. मालिकेमध्‍ये राधेची (रवी महाशब्‍दे) माजी पत्‍नी महुआची भूमिका साकारणार आहे. गुप्‍ता कुटुंबाच्‍या जीवनांमध्‍ये विलक्षण हास्‍यजनक कहर निर्माण करण्‍यास ती आता सज्‍ज आहे.

काय आहे मालिकेची स्टोरीलाईन?

महुआ तिच्‍या मुलासोबत गुप्ता कुटुंबात येते, ज्‍यामुळे कुटुंबामध्‍ये गोंधळ निर्माण होतो आणि सरला (समता सागर) हवेलीमध्‍ये राहण्‍यास जाते. पण सर्वात मजेशीर बाब म्‍हणजे राधेला सरलाव्‍यतिरिक्‍त दुस-या महिलेसाबत विवाह केल्‍याचे आठवत नाही आणि तिच्‍यापासून मुलगा असल्‍याचे देखील आठवत नाही. या तिन्‍ही पात्रांमध्‍ये गोंधळाची पण विनोदी स्थिती निर्माण होते.

आपला आनंद व्‍यक्‍त करत महुआची भूमिका साकारणारी संभावना सेठ म्‍हणाली,''मला अँड टीव्‍हीवरील हलकी-फुलकी मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये महुआची भूमिका साकारण्‍यासह टेलिव्हिजनवर परतण्‍याचा आनंद झाला आहे. मी पहिल्‍यांदाच हलक्‍या-फुलक्‍या शैलीतील मालिकेमध्‍ये काम करणार आहे. महुआच्‍या मालिकेमधील प्रवेशासह प्रेक्षकांना विनोदी गोंधळ व हास्‍यपूर्ण मनोरंजन पाहायला मिळणार आहे. मला विश्‍वास आहे की, प्रेक्षकांना माझी ही भूमिका आवडेल आणि ते माझ्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव करतील व पाठिंबा देतील. मी मालिकेमधील प्रत्‍येकासोबत काम करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.''

बातम्या आणखी आहेत...