आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानृत्यांगना, टीव्ही अभिनेत्री आणि यूट्यूब व्लॉगर संभावना सेठची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मंगळवारी तिला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवसांत तिला दुस-यांदा रुग्णालयात न्यावे लागले होते. संभावनाचा नवरा अविनाश द्विवेदीने सोशल मीडियावर ही माहिती देताच तिचे चाहते काळजीत पडले. एका संभाषणात संभावनाने यामागील कारण सांगितले.
संभावनाने सांगितल्यानुसार, तिचे ब्लड प्रेशर खूप लो झाले होते. म्हणून तिला तातडीने रुग्णालयात जावे लागले. स्पॉटबॉयशी बोलताना ती म्हणाली, "माझे ब्लड प्रेशर खूप लो झाले होते, त्यामुळे मी बेशुद्ध पडले होते. माझ्या कानात खूप इन्फेक्शन झाले आहे. या क्षणी, माझे कान पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत."
जवळपासच्या एकाही रुग्णालयाने दार उघडले नाही
संभावनाने या संभाषणात सांगितले की, नजीकच्या एकाही रुग्णालयाने त्यांना आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात जावे लागले. ती सांगते, "मला पहाटे चार वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जवळच्या कोणत्याही रुग्णालयाने आमच्यासाठी दरवाजे उघडले नाहीत. त्यानंतर आम्ही कोकिलाबेन रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर मला तपासायला तयार झाले. तपासणीनंतर त्यांनी मला घरी जाण्याचा सल्ला दिला. कारण मी तिथे सुरक्षित नव्हते. म्हणून आम्हाला तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात जावे लागले." काही वेळाने ती पुन्हा घरी परतली होती.
'देव करो कुणाचीही तब्येत बिघडू नये'
संभावना सांगते, "मी देवाला प्रार्थना करते की, अशा वेळी कोणीही आजारी पडू नये. कारण बाहेरील परिस्थिती खूपच वाईट आहे. रुग्णालय तुम्हाला मदत करण्याच्या स्थितीत नाही हे पाहून तुम्हाला आणखी आजारी वाटेल. जेव्हा मी एका हॉस्पिटलमधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा मी घाबरुन गेले होते. असे वाटले की मला काहीतरी मोठे झाले आहे."
अविनाशने पोस्टमध्ये लिहिले होते...
मंगळवारी अविनाशने संभावनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिले, "काल रात्री संभावनाची तब्येत बिघडल्यामुळे आम्हाला रुग्णालयात धाव घ्यावी लागली. आम्ही पहाटे पाच वाजता घरी परत आलो आणि पुन्हा रुग्णालयात जात आहोत. त्यामुळे आज व्लॉग प्रसिद्ध होणार नाही." ‘बिग बॉस 2’ मध्ये संभावना स्पर्धक म्हणून झळकली होती. तिने 'डान्सिंग क्वीन' आणि 'दिल जीतेगी देसी गर्ल' सारखे रिअॅलिटी शो देखील केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.