आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sara Gurpal Calls Herself Single In The Frand Premier, Punjabi Singer Tushar Kumar Released Marriage Certificate And Photos Giving Evidence Of Thier Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात बिग बॉस 14 चे स्पर्धक:सारा गुरपालने शोमध्ये स्वत:ला म्हटले सिंगल, पंजाबी गायक तुषार कुमारने लग्नाचा पुरावा देताना दाखवले मॅरेज सर्टिफिकेट

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बातमीनुसार साराने लग्नाच्या वर्षभरातच विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 14 आता सुरू झाला आहे. शो सुरू झाल्याच्या 2 दिवसांतच शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी संबंधित वाद समोर येत आहेत. यंदाच्या पर्वात पंजाबी गायिका सारा गुरपाल या शोमध्ये एंट्री घेतली असून तिची तुलना शहनाज गिलशी केली जातेय. शोच्या ग्रॅण्ड प्रीमिअरमध्ये सलमान खानला साराने सिंगल असल्याचे सांगितले. मात्र पंजाबी गायक तुषार कुमारने दावा केला आहे की, दोघांनी 2014 मध्ये लग्न केले होते.

शोमध्ये एन्ट्री घेताना सलमानने साराबरोबर मजेशीर खेळ खेळत तिला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले. त्याचे उत्तर देताना साराने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगितले. स्वतःला अविवाहित असल्याचे सांगणारा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर तिच्या नव-याने ऑफिशिअल स्टेटमेंट जारी करुन सारासोबत लग्न झाल्याचा खुलासा केला. तुषार म्हणाला, 'माझे जिच्यासोबत लग्न झाले ती सारा आहे, हे मी सांगू इच्छितो. ती अविवाहित असल्याचे खोटे बोलतेय.'

तुषारने समोर आणले मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाचे फोटो
तुषारने सांगितल्यानुसार, दोघांनी 16 ऑगस्ट 2014 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये लग्न केले होते. त्याने मॅरेज सर्टिफिकेट सारासोबतची काही छायाचित्रेसुद्धा समोर आणली आहेत. फोटोमध्ये साराच्या हातात लग्नाचा लाल चुडा दिसतोय. मॅरेज सर्टिफिकेटवर साराच्या नावाचा उल्लेख रचना देवी असा आहे.

सारा गुरपाल आणि तुषार कुमार यांचे मॅरेज सर्टिफिकेट
सारा गुरपाल आणि तुषार कुमार यांचे मॅरेज सर्टिफिकेट

साराने लग्न प्रसिद्धीसाठी केले होते : तुषार

स्वत:ला साराचा नवरा असल्याचे सांगणा-या तुषारने आरोप केला की, “साराने प्रसिद्धी आणि अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी माझ्यासोबत लग्न केले होते. पण जेव्हा तिला माझ्याकडून प्रसिद्धी मिळाली नाही तेव्हा तिने मला सोडले'.

तुषारसोबत सारा गुरपाल.
तुषारसोबत सारा गुरपाल.

पतीशी झालेल्या भांडणानंतर साराने घटस्फोट घेतला

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, सारा गुरपालने सहा वर्षांपूर्वी तुषारसोबत लग्न केले होते. दोघेही जालंधरचे आहेत पण कामानिमित्ताने तुषार यूएसएमध्ये राहतो. दोघांनी काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीने लग्न केले. लग्नानंतरही सारा सहा महिने भारतात राहिली. नंतर सारा जेव्हा यूएसएला गेली तेव्हा दोघांमध्ये फारसे पटेनासे झाले. बातमीनुसार साराने लग्नाच्या वर्षभरातच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सारा आणि तुषार दोघेही आपले वेगळे आयुष्य जगत आहेत आणि ते एकमेकांच्या संपर्कातदेखील नाहीत.

बातम्या आणखी आहेत...