आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सारेगमप लिटिल चॅम्प्स:या आठवड्यात मंचावर अवतरणार राम-लक्ष्मण-सीता, मनीष पॉलने घेतले अरुण गोविल यांच्याकडून धनुष्यबाण चालविण्याचे धडे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आठवड्यात प्रेक्षकांना कलाकारांकडून अनेक रंजक किस्सेदेखील ऐकायला मिळणार आहेत.

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या लहान मुलांमधील गायनकलेचा शोध घेणार्‍्या सर्वात लोकप्रिय कार्यक्रमाच्या 18 जुलै रोजी झालेल्या पुनरागमनाच्या भागात त्यातील गुणी बालस्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. आता या आठवड्यात हा कार्यक्रम सुरू होत असून त्याच्या पौराणिक विशेष भागात ‘रामायण’ या विलक्षण लोकप्रिय मालिकेतील अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता) आणि सुनील लाहिरी (लक्ष्मण) हे प्रमुख कलाकार तसेच ‘महाभारत’ मालिकेतील दुर्योधनाची भूमिका साकारणारा अभिनेता पुनीत इस्सर सहभागी होणार आहेत. पण प्रेक्षकांसाठी आणखीही बरेच काही या भागात आहे.

या भागात सर्व बालस्पर्धकांनी अप्रतिम आवाजात गाणी सादर करून सर्व परीक्षकांवर चांगलाच प्रभाव टाकला, हे खरे; पण अरुण गोविलने केलेल्या एका कृतीमुळे सर्वजण चकित झाले. ‘रामायण’ मालिका प्रसारित झाल्यानंतर तब्बल 33 वर्षांनीही आपण अचूक धनुष्यबाण चालवू शकतो, हे अरुण गोविल यांनी दाखवून दिले. त्यांचे हे कौशल्य पाहून परीक्षक आणि ज्यूरींचे सदस्य थक्कच झाले. तेव्हा अरुण गोविल यांनी आपल्यालाही धनुष्यबाण कसा चालवायचा, ते शिकवावे, अशी इच्छा सूत्रसंचालक मनीष पॉलने व्यक्त केली. तेव्हा अरुण गोविल यांनी अतिशय पध्दतशीरपणे त्याला धनुष्यबाण कसा धरायचा आणि नेम धरून बाण कसा सोडायचा, ते शिकविले. इतकेच नव्हे, तर मनीष पॉलच्या डोक्यावर ठेवलेल्या सफरचंदाला अचूक लक्ष्य करून आपले कौशल्य पुन्हा एकदा सिध्द केले.

आता राम, लक्ष्मण आणि सीता कार्यक्रमात उपस्थित असल्याने प्रेक्षकांना काही रंजक किस्से निश्चितच ऐकायला मिळतील आणि बालस्पर्धकांकडून काही अप्रतिम गाणी ऐकायला मिळतील. रनिता बॅनर्जीने ‘ऐसा लगता है’ हे गाणे अतिशय तन्मयतेने सादर केले, तर झैद अलीने ‘कुन फाया कुन’ हे गीत अप्रतिमपणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या भागात प्रेक्षकांना अनेक मधुर गीते आणि जुन्या आठवणी ऐकायला मिळतील