आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका:'सरगम की साढेसाती' लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, हे आहे हलक्या फुलक्या मालिकेचे कथानक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावर लवकरच हलक्या फुलक्या स्वरुपाची विनोदी मालिका 'सरगम की साढेसाती' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लाँच करणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना टीव्ही स्क्रीनसमोर खिळवून ठेवेल.

अत्यंत मनोरंजक कथा असलेल्या या विनोदी मालिकेत अंजली तत्रारी ही अभिनेत्री सरगमच्या तर कुनाल सलुजा हा अभिनेता अपारशक्ती अवस्थी या प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्याबरोबरच दर्शन जरीवाला, राजेंद्र चावला, सनत व्यास, जैनीराज राजपुरोहित, विभू भोलवानी, वैभव मांगले, आकाश मखिजा आणि अजिंक्य मित्रा अशा गुणवान कलाकारांची टीम असेल.

गाझियाबादच्या पार्श्वभूमीवर बेतलेली सरगम की साढेसाती ही विनोदी मालिका सरगम आणि तिच्या जगावेगळ्या सासुरवाडीत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. सासरी साडे सात पुरुषांमध्ये सरगम ही एकटीच महिला आहे. या कुटुंबातील प्रत्येक पुरुष हा त्यांच्या विचारांवर कायम ठाम राहणारा असा आहे, त्यामुळे कुटुंबातील अगदी साधी घटनादेखील मजेशीर आणि गुंतागुंतीच्या स्थितीपर्यंत पोहोचत असल्याचे पाहायला मिळते.

दैनंदिन जीवनामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये अगदी लहान अडचणींमुळेदेखिल कशा प्रकारे मजेशीर प्रसंग निर्माण होतात याचे सुंदर सादरीकरण या मालिकेच्या माध्यमातून केले आहे.

बातम्या आणखी आहेत...