आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यथा:आर्थिक परिस्थिती अशी की उपचारासाठीही पैसे नाहीत, वाढदिवशी 'ससुराल सिमर का' फेम आशिष रॉयने केली मृत्यूची याचना  

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशिष म्हणाले, मी एकटा आहे आणि माझी काळजी घेण्यास कोणीही नाही. मी लग्नही केले नाही. एकटेपणाचा खूप त्रास होतोय. जीवन सोपे नाही.

मुंबईच्या एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले अभिनेते आशिष रॉय यांनी आर्थिक अडचणीमुळे उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्य मराठीकडे आपली व्यथा सांगताना आशिष म्हणाले की घरी जाऊन जरी मेलो तरी त्याचे दु: ख वाटणार नाही .

'ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या आशिष यांचे मूत्रपिंड खराब आहे. या कारणास्तव, त्यांच्या शरीरात पाणी जमले आणि पाय सुजले आहेत. कोरोनाव्हायरसच्या भीतीपोटी कोणताही डॉक्टर त्यांना पाहण्यास तयार नव्हता. बरीच विणवणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.आशिष म्हणाले, "आज (18 मे) माझा वाढदिवस आहे आणि मी या अवस्थेत पडलोय. मला नीट चालताही येतन नाहीये. दोन दिवसांपूर्वी मी बर्‍याच डॉक्टरांशी संपर्क साधला. पण कोणीही मदत केली नाही. बरीच विनंती केल्यानंतर एक जुन्या जवळच्या डॉक्टरांनी उपचार करण्यास सहमती दर्शविली.

'रुग्णालयात दाखल व्हायला 4 तास वाट बघावी लागली'

54 वर्षीय आशिष म्हणतात, "मी हिंमत एकवटून रुग्णालयात पोहोचलो तर तिथे कुणीच नव्हते. चार तास वाट पाहिल्यानंतर रिसेप्शनिस्टने बोलावले. तेव्हा डॉक्टरांनी मला तपासले आणि अॅडमिट व्हायला सांगितले. मला किडनीचा त्रास आहे. पण डायलिसिससाठी मला सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत थांबावे लागले. नीट जेवणही मिळत नाहीये. खूप  त्रासातून जात आहे."'वाईट काळात कुणीही साथ देत नाही'

आशिष पुढे म्हणाले, "या वाईट काळात मला कुणीही साथ देत नाहीये. मी एकटाच याचा सामना करीत आहे. कोलकाता येथे लग्न झालेली एक बहीण आहे. सहसा ती मला मदत करते. पण लॉकडाऊनमुळे तीदेखील मला मदत करु शकत नाहीये. ती कोलकात्यात अडकली आहे."

'अशा प्रकारे जीवन जगणे खूप कठीण आहे'

आशिष म्हणाले, "आतापर्यंत उपचारासाठी जवळपास 4 लाख रुपये खर्च आला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून कोणतेही उत्पन्न नाही. म्हणून मी उपचार अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपचाराविना मी घरी मेलो तरीसुद्धा काही दु: ख नाही. सध्या मला कुणीही आर्थिक मदत करत नाहीये. माझे आयुष्यभराची बचत खर्च झाली आहे. आता असे आयुष्य जगणे फार अवघड आहे.'

यावर्षी जानेवारी महिन्यात तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गोरेगाव येथील एसआरव्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या शरीरात 9 लीटर पाणी जमा झाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आशिष यांनी आपली व्यथा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते, “सकाळची कॉफी, विना साखरेची, हे हास्य सक्तीचे आहे. देवा मला वर उचल.''

 

आशिषकडे काम नाही

2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला. आशिष म्हणाले, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केले जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्याने मला काम द्यावे, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.'

आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्ट असून त्यांनी 'जोकर' या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...