आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचा खुलासा:'ससुराल सिमर का' सोडल्यानंतर बेरोजगार झाला होता शोएब इब्राहिम, 3 वर्षे दीपिका कक्करने केली होती मदत

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ससुराल सिमर का' फेम शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर लवकरच आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नेंसीमुळे दीपिकाने सध्या छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. तर दुसरीकडे शोएब त्याचा नवीन शो 'अजुनी'मध्ये बिझी आहे. शोएबने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगताना कठीण काळात त्याची पत्नी त्याच्या पाठीशी कशी उभी राहिली याबद्दल खुलासा केला आहे. शोएबने सांगितले की, त्याच्याकडे काम नसताना दीपिकाने त्याला खूप मदत केली होती.

शोएबने 2013 मध्ये 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडली होती. या मालिकेनंतर तीन वर्षे हातात काहीच काम नव्हते, असे त्याने सांगितले. एखाद्या दृश्यात केवळ उभे राहण्यापेक्षा स्वतःवर विशेष काम करायला आवडेल, असेही शोएब म्हणाला.

शोएब-दीपिकाची भेट 'ससुराल सिमर का' या टीव्ही शोदरम्यान झाली होती.
शोएब-दीपिकाची भेट 'ससुराल सिमर का' या टीव्ही शोदरम्यान झाली होती.

माझ्याकडे काहीच नसताना तिने मला साथ दिली - शोएब
ETimes शी बोलताना शोएब म्हणाला, 'त्यावेळी माझ्याकडे काही सेव्हिंग होती, जी त्याकाळात कामी आली. याकाळात दीपिकाने मला खूप पाठिंबा दिला आणि मी तिने केलेली मदत स्वीकारण्यास कधीच मागेपुढे पाहिले नाही आणि ही गोष्ट मी अभिमानाने स्वीकारतो.'

तो पुढे म्हणाला, 'म्हणूनच मी तिच्यासाठी काहीही करायला कधीच मागेपुढे पाहात नाही. कारण माझ्याकडे काहीच नसताना तिने मला साथ दिली. माझ्या वडिलांकडेही काही बचत होती, जी आम्ही वापरली. माझे संपूर्ण कुटुंब दीपिकाचे ऋणी आहे, तिने कायमच माझ्या कुटुंबावर जीवापाड प्रेम केले आहे. आम्हाला सर्व प्रकारे तिने साथ दिली.'

दीपिका जेव्हा शोएबला भेटली तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.
दीपिका जेव्हा शोएबला भेटली तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.

तेव्हा दीपिका माझी मैत्रीण होती, तिने मला खूप सपोर्ट केला
शोएब पुढे म्हणाला, 'मला शो सोडण्याची भीती वाटत होती, पण मला माहित होते की मोठी कामे करण्यासाठी धोका पत्करावा लागतो. जेव्हा मी शोमध्ये काम करत होतो, तेव्हा माझ्याकडे थोडी बचत असायची. त्याकाळात दीपिका माझी फक्त जवळची मैत्रीण होती आणि तिने मला नेहमीच पाठिंबा दिला. मी शो सोडल्यानंतरही आमच्यात चांगले संबंध होते. हळूहळू मी काम करून स्वतःला तयार केले. त्या तीन वर्षांत मी स्वत:वर लक्ष देऊन नवीन गोष्टी शिकलो.'

दीपिकाचे पहिले लग्न रौनक सॅमसनसोबत झाले होते. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर शोएब आणि तिची प्रेमकहाणी सुरू झाली.
दीपिकाचे पहिले लग्न रौनक सॅमसनसोबत झाले होते. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर शोएब आणि तिची प्रेमकहाणी सुरू झाली.

कोई लौट के आया है आणि नच बलियेमधून निर्माण केली वेगळी ओळख

3 वर्षांच्या ब्रेकनंतर शोएब इब्राहिमने 2017 मध्ये 'कोई लौट के आया है' या शोद्वारे पुनरागमन केले. त्याच वर्षी तो आणि दीपिका 'नच बलिए' या शोमध्ये एकत्र दिसले. त्याने 'जीत गई तोहे पिया मोरे', 'इश्क में मरजावां' या टीव्ही मालिका आणि 'बटालियन 609' या चित्रपटात काम केले. अभिनेता सध्या 'अंजूनी'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय तो दीपिकासोबत व्लॉगही करतो, ज्याद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात असतो.