आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनला मानधनात करावी लागली कपात, म्हणाली- 'या महामारीमुळे अतिशय वाईट परिणाम झाले आहेत'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पे-कटचा मार फक्त मलाच नव्हे तर अनेकांना बसला आहे.

अभिनेत्री सौम्या टंडन सध्या 'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेत झळकत आहेत. मालिकेत ती गोरी मेमच्या भूमिका वठवत आहे. लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते, पण आता अनलॉक झाल्यावर पुन्हा मालिकेचे शुटिंग सुरू होत आहे. परंतु, कोरोनामुळे, परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही.

कोरोनामुळे प्रत्येक इंडस्ट्रीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे, तर बर्‍याच लोकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. येथे देखील टीव्ही स्टार्सना आता पे-कटचा सामना करावा लागत आहे. यातून सौम्याही सुटलेली नाही. निर्मात्यांनी तिलादेखील फी कमी करण्यास सांगितले आहे.

सौम्याने याबाबत टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. सौम्या म्हणाली, 'पे-कटचा मार फक्त मलाच नव्हे तर अनेकांना बसला आहे. हे फक्त एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत घडले असे नाही तर सर्वच क्षेत्रात असे चित्र आहे. आम्ही यापुढे आता जे काम करु त्या कामासाठी लागू होईल. यापूर्वी केलेल्या कामाच्या मानधनात कपात करण्यात आलेली नाही. पेंडिंग पेमेट पूर्ण दिले जाणार आहे', असे सौम्याने सांगितले.

ती पुढे म्हणाली, 'साथीच्या रोगाने बर्‍याच प्रकारे वाईट परिणाम आणले आहेत. अशा परिस्थितीत, केवळ मीच नव्हे तर माझ्या इतर टेलिव्हिजन मित्रांनादेखील वेतन-कपातीचा सामना करावा लागत आहे. सर्व प्रॉडक्शन हाऊसेसनी आर्टिस्टला यापुढे मानधनात कपात करावी लागले, हे कळवले आहे.

पेंडिंग आहे सौम्याची फी :  यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सौम्या म्हणाली होती, 'माझे बरेच पेमेंट शिल्लक आहे जे अद्याप मला मिळालेले नाही. मी प्रॉडक्शन हाऊसवर  शंका घेत नाही, मला खात्री आहे की ते लवकरच हे देतील. काही कलाकारांना पेमेंटसाठी थांबणे शक्य होते, पण काहींना मात्र यामुळे ब-याच अडचणी येतात. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते, अनेकांना घरभाडे द्यावे लागते. पेमेंट अडकणे हे निराशाजनक आहे.

ती पुढे म्हणाली, 'बरेच लोक म्हणतात की चॅनलला जाहिराती मिळत नाहीत. त्यांच्याकडे पैसेही नाहीत परंतु आमची देय रक्कम आम्ही केलेल्या कामाची आहे. आम्ही 90 दिवसांच्या क्रेडिट कालावधीवर काम करतो. माझ्या मते, आमच्या कामाचा महसूल आधीच निर्मात्यांना मिळाला आहे, म्हणून त्यांनी पेमेंट क्लिअर करायला हवी. मी आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून मी उशीरा फी मिळाली तरी थांबू शकते, परंतु अनेकजण ही वाट बघू शकत नाहीत.' 

बातम्या आणखी आहेत...