आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेच्या 20 वर्षांच्या लीपनंतर सेहरीश अली घेणार प्रेक्षकांचा निरोप, सहकलाकारांना अलविदा करताना झाली इमोशनल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेहरीश अलीला मालिकेचा निरोप घेणे फार अवघड गेले.

आपल्या सुनांपेक्षाही वयाने लहान असलेल्या भारतातील सर्वात लहान सासूच्या वैशिष्ट्यपूर्ण कथेमुळे ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. गुड्डन (कनिका मान) आणि अक्षत जिंदाल (निशांतसिंह मलकाणी) यांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना भुरळ घातली असली, तरी आता या कथानकात होत असलेल्या बदलाने सर्वांना मोठा धक्का बसणार आहे. अभिनेत्री सेहरीश अली ही या मालिकेत सुरुवातीपासून असून तिच्या लक्ष्मी अगरवाल-जिंदाल या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण आता ही अभिनेत्री या मालिकेतून बाहेर पडत आहे. तिला या मालिकेच्या सर्व कलाकारांनी आणि कर्मचा-यांनी नुकताच जल्लोषपूर्ण पण भावपूर्ण निरोप दिला.

या मालिकेशी प्रारंभापासून लक्ष्मी अगरवाल-जिंदाल म्हणून निगडित राहिलेल्या सेहरीश अलीला मालिकेचा निरोप घेणे फार अवघड गेले. लॉकडाऊननंतर नव्याने सुरू झालेल्या या मालिकेच्या कथानकाचा काळ आता 20 वर्षांनी पुढे नेण्यात आल्याने लक्ष्मीची भूमिका संपुष्टात आली होती. त्यामुळे सेहरीशने मालिकेचा भावपूर्ण निरोप घेतला. तिचा हा निरोप समारंभ संस्मरणीय करण्यासाठी कर्मचा-यांनी एक खास केक आणला होता. सर्वांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘गुड्डन…’मध्ये भूमिका साकारण्याच्या आपल्या अनुभवाविषयी सेहरीश अली म्हणाली, “लक्ष्मीची व्यक्तिरेखा ही माझ्यासाठी अगदी खास असून ती माझ्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग बनून गेली होती. या मालिकेत भूमिका साकारताना सर्वांबरोबरच्या असंख्य आठवणी सोडून देणं मला शक्य नव्हतं. पण ते म्हणतात ना, नव्या प्रारंभासाठी सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतोच. या टीमबरोबर काम करताना मला खूपच मजा आली. या मालिकेत मी प्रवेश केल्यानंतर मला एक नवं कुटुंब लाभलं आणि आतापर्यंत या कुटुंबाने मला सदैव नवं बळ आणि प्रोत्साहनच दिलं आहे. त्यांनी माझ्यावर केलेलं हे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद मी बरोबर घेऊन जात आहे. इतकं प्रेम आणि इतक्या सदिच्छा मिळाल्यामुळे मी भारावून गेले आहे. आता माझ्यासाठी भविष्यात काय मांडून ठेवलं आहे, ते जाणून घेण्यास मी उत्सुक झाले आहे.”