आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'बंदिनी', 'गोद भराई', 'किसनी मोहब्बत है 2' आणि 'कुलदीपक' सारख्या मालिकांमध्ये झळकलेला टीव्ही अभिनेता शार्दुल कुणाल पंडितला नैराश्येने ग्रासले आहे. तो मुंबई सोडून आपल्या मुळगावी इंदौर शहरात परतला आहे. अभिनेत्याने हा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला मुंबई सोडायची इच्छा नव्हती, परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की येथे त्याला उदरनिर्वाह करणे कठीण झाले.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शार्दुल म्हणाला की, आजारपणामुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्याच्याजवळ काम नाहीये. त्याने सांगितले, "तीन वेळा कावीळ झाल्यामुळे मी जवळजवळ वर्षभरापासून आजारी आहे. त्यामुळे 'मुझसे शादी करोगे' हा रिअॅलिटी शो माझ्या हातातून गेला. लॉकडाऊनच्या आधी मला एका वेब सीरिजची ऑफर मिळाली होती. पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही. गेल्या तीन महिन्यांत (लॉकडाऊनमध्ये) माझ्याकडे जमा केलेले सर्व पैसेसुद्धा संपले.”
शार्दुलच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक अपयश आणि आजारपणाचा परिणाम त्याच्या मानसिक स्थितीवर झाला. तो म्हणाला, “नकार, अपयश, आजारपण या सर्व कारणांमुळे मी नैराश्यात गेलो. 2019 मध्ये मी मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेतली. मी पेंटिंग, मेडिटेशन आणि लिखाणात वेळ घालवला.'' अजून नैराश्यातून सावरतोय, असे त्याने सांगितले.
शार्दुलने सांगितले, ''मला मुंबई सोडायची नव्हती. पण आता माझ्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही. माझे काम बंद असले तरी इथे मला घराचं भाडे आणि इतर गोष्टींवर खूप पैसा खर्च करावा लागतोय. त्यामुळे मी गावी जाण्याचा निर्णय घेतलाय”, असे तो म्हणाला.
शार्दुलच्या सांगण्यानुसार, टीव्ही इंडस्ट्रीतील निकष कलाकारांवर भारी पडतात. तो म्हणतो, "समजा उद्या मला एखादा प्रोजेक्ट मिळाला तरी, इंडस्ट्रीच्या निकषांनुसार, मला तीन महिन्यांनंतर पेमेंट मिळण्यास सुरवात होईल. टीव्ही कलाकारांसाठी प्रतीक्षेचा कालावधी कंबरडे मोडणारा असतो. कारण खर्च कधीच थांबत नाहीत", अशी खंत त्याने व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.