आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शाहीर शेखने रुचिका कपूरसोबत लग्न केले आहे. शुक्रवारी दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचल्या होत्या. लग्नानंतर रुचिकाने सोशल मीडियावर पती शाहीरसोबतचा फोटो शेअर केला आहेत.
होम टाउन मध्ये होणार पारंपरिक पद्धतीने लग्न
नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर शाहीर शेख आणि रुचिका जम्मूला रवाना झाला. शाहीर मुळचा जम्मूचा आहे. येथे त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच
रुचिकाच्या माहेरी म्हणजेच मुंबईतदेखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी पुढील वर्षी जून महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा िनर्णय घेतला आहे.
चित्रपटांमध्ये झळकली आहे रुचिका
शाहीर शेख आणि रुचिकाची भेट दोन वर्षांपूर्वी 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांनी दीड वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शाहीरने साखरपुड्याची
अधिकृत घोषणा केली होती. रुचिकाविषयी सांगायचे म्हणजे तिने राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या', 'जबरिया जोडी', 'डॉली किट्टी और वो चमके सितारे' आणि 'ड्रीम गर्ल' मध्ये देखील काम केले
आहे. ती बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेडची क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.