आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 वाद:आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे; मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी शालिनी ठाकरेंचा जान सानूला सज्जड इशारा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीदेखील जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

बिग बॉस 14 या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये सध्या राहुल वैद्य, निक्की तंबोली आणि जान कुमार सानू यांच्यात वाद सुरु असल्याचे दिसत आहेत. या वादादरम्यान जान सानूने मराठी भाषेचा अवमान करत आक्षेपार्ह शब्द उच्चारले. त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत असून त्याची या कार्यक्रमातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीदेखील जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

“मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

अमेय खोपकर काय म्हणाले?
“जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला”, असे म्हणत अमेय खोपकर यांनी जान सानूला इशारा दिला आहे.

इतकेच नाही तर ते पुढे म्हणाले, “मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले”, असे म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.