आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:कोविड -19 मुळे लांबणीवर पडले अभिनेत्री शमा सिकंदरचे लग्न, सप्टेंबरमध्ये जेम्ससोबत घेणार होती सप्तपदी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी सप्टेंबर महिन्यात शमाचे लग्न होणार होते.

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अभिनेत्री शमा सिकंदरला तिचे लग्न रद्द करावे लागले आहे. जेम्स मिलिरॉनबरोबर ती लग्नाच्या बेडीत अडकणार होती. मात्र कोविड 19 मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे तिने लग्न लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेणे पसंत केले आहे.  

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शमा म्हणाली, 'सप्टेंबरच्या शेवटी आम्ही डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणापासून ते सर्वकाही फायनल झाले होते. आमच्या दोघांच्याही घरी लग्नाची तयारीदेखील सुरु झाली होती. जेम्सचे पालक अमेरिकेत राहत असून त्यांना भारतात येण्यासाठी पासपोर्ट बनवायचा होता.'

'त्यांनी कागदपत्रांचे काम सुरु केले होते, जेमेकरुन पासपोर्ट बनतील. परंतु आता आम्ही हे सर्व स्थगित केले आहे. कारण याकाळात प्रवास करणे योग्य नाही. जेम्स सध्या माझ्याबरोबर मुंबईत आहे, पण आम्हाला त्याच्या पालकांची काळजी आहे.'

'कोरोनाने आपल्या सर्वांचे जीवन बदलले आहे. या कठीण काळातून बाहेर पडणे सध्या गरजेचे आहे. लग्न तर पुढेही होईल.'

2016 मध्ये झाला होता साखरपुडा :

शमाने 2016 मध्ये जेम्ससोबत साखरपुडा केला होता. 38 वर्षीय शमा 'ये मेरी लाइफ है' हा टीव्ही शो, 'सेक्सोहॉलिक' ही वेब सीरिज आणि आणि 2019 मध्ये आलेल्या बायपास रोड या चित्रपटासाठी ओळखली जाते.   

बातम्या आणखी आहेत...