आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:‘गुंडे’मधील प्रियांका चोप्राच्या भूमिकेवरून शमीन मन्ननने भूमिकेसाठी घेतली प्रेरणा, ‘राम प्यारे सिर्फ हमारे’मध्ये साकारतेय कोएलची व्यक्तिरेखा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शमीन म्हणते - मला गुंडे चित्रपटात प्रियांकाने साकारलेल्या नंदिताची व्यक्तिरेखा खूपच प्रभावी वाटली.

‘झी टीव्ही’वर ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ ही एका हलकी फुलकी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भोपाळमध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर चालविणारा राम आणि त्याची पत्नी दुलारी यांची ही मजेदार कथा आहे. आपल्या गल्लीतील महिला आपल्या प्रेमाचे जाळे टाकून रामला आपल्याकडे आकर्षित करतील, या भीतीपोटी दुलारी एका पुस्तकातून नवनवे उपाय काढून रामला सुरक्षित ठेवण्यासाठी ते योजत असते.

राम आणि दुलारी यांच्या या प्रेमकथेला खमंग मसाला पुरविण्यासाठी मालिकेत त्यांची शेजारीण कोएलच्या रूपात एक व्यक्तिरेखा समाविष्ट करण्यात आली आहे. गुणी अभिनेत्री शमीन मन्नन ही कोएलची भूमिका रंगवीत आहे.

कोएल ही आकर्षक आणि बोलघेवड्या स्वभावाची महिला असून ती हुशारही असते. शमीन ही हरहुन्नरी अभिनेत्री असून ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने खास परिश्रम घेतले आहेत. या भूमिकेसाठी तिने आपली तंदुरुस्ती आणि लूकवरच लक्ष केंद्रित केले आहे, असे नव्हे, तर तिने आपल्या या भूमिकेसाठी बरेच संशोधन आणि गृहपाठही केला आहे.

रामवर प्रभाव टाकणा-या महिलेची भूमिका उभी करण्यासाठी तिने मनोरंजन उद्योगातील दोन नामवंत व्यक्तिरेखांवरून प्रेरणा घेतली आहे. या व्यक्ती आहेत आपली देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडची मादक सौंदर्यवती अभिनेत्री मेरिलिन मन्रो.

आपल्या व्यक्तिरेखेच्या पूर्वतयारीसंदर्भात ‘राम प्यारे सिर्फ हमारे’तील अभिनेत्री शमीन मन्नन म्हणाली, “कोएल ही मादक महिला आहे. तिची प्रत्येक कृती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. किंबहुना प्रत्येक महिलेला आपण कोएलसारखं असावं, असं वाटतं आणि कोएलसारखी महिला आपल्या आजूबाजूला असावी, अशी प्रत्येक पुरुषाची मनोमन इच्छा असते. कोएलची स्वत:ची खास शैली आहे, तिचं स्वत:चं आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. तिचं बोलणं वेगळ्याच प्रकारचं आहे. तसंच ती नेहमी ‘आए बडे’ हे पालुपद आळवीत असते. या गोष्टी मी स्वत:च शोधून काढल्या. सहजगत्या कोणत्याही पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करणारी अशी व्यक्तिरेखा उभी राहिली पाहिजे, असं मला कोएलसंदर्भात सांगण्यात आलं होतं. तेव्हा मी अशी महिला उभी करण्यासाठी माझा शोध सुरू केला, तेव्हा या कसोटीला उतरतील अशा दोन अभिनेत्री मला सापडल्या. यापैकी एक होती हॉलिवूडची मदमस्त ललना मेरिलिन मन्रो आणि दुसरी होती आपली भारतीय सुपरस्टार प्रियांका चोप्रा. माझ्या मते या दोन्ही अभिनेत्रींनी आतापर्यंतच्या सर्वात हॉट स्त्रीच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यावर त्यांनी ज्या प्रकारे अशा स्त्रीला उभं केलं आहे, ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.”

शमीन पुढे म्हणाली, “राम प्यारे सिर्फ हमारेतील कोएलच्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी या दोन्ही अभिनेत्रींचे मी अनेक चित्रपट पाहिले. त्यातून मला गुंडे चित्रपटात प्रियांकाने साकारलेल्या नंदिताची व्यक्तिरेखा खूपच प्रभावी वाटली. त्या चित्रपटात प्रियांका आपल्या मदमस्त व्यक्तिरेखेसह ज्या प्रकारे वावरली आहे, तिने आपली शालीनता उभी केली आहे आणि तिचं वागणं-बोलणं हे सर्वच मला माझी व्यक्तिरेखा साकारताना उपयोगी पडलं.”

बातम्या आणखी आहेत...