आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारेगमप लिट्ल चॅम्प्स:गणपती विशेष भागात पुण्याच्या 85 वर्षांच्या शांताबाई पवार दाखविणार आपले लाठी-काठी फिरविण्याचे कौशल्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सा रे ग म प लिट्ल चॅम्प्स’चा हा ‘गणपती विशेष’ भाग येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 8.00 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

‘सा रे ग म प लिट्ल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचा हा आठवडा ‘गणपती विशेष’ म्हणून प्रसारित केला जाणार असून त्यात या उत्सवाचा जोश आणि भव्यता यांची जाणीव होईल. या भागात अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली यांच्यातील चर्चेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईलच, पण या भागात आपल्या विलक्षण चापल्यपूर्ण कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी एक विशेष अतिथी सहभागी होणार आहे. या आठवड्यात पुण्याच्या 85 वर्षांच्या शांताबाई पवार पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

माधव आणि सई यांनी अप्रतिम सादर केलेल्या ‘शेरोवाली, उँचे डेरोवाली’ या गाण्यानंतर शांताबाई पवार आपले विलक्षण कौशल्य दाखवणार आहेत. त्यांच्या या कौशल्याचा व्हिडिओ यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला असून त्यांच्या अंगातील या कौशल्याने सारा देश चकित झाला आहे. वयाच्या 85 व्या वर्षीही त्या एखाद्या तरुणीप्रमाणे लाठी-काठी अत्यंत वेगाने आपल्या शरीराभोवती फिरविण्याचे कौशल्य अगदी सहजतेने सादर करतात. त्यांच्या या गुणांवरच त्यांचा चरितार्थ चालतो. पूर्वी हेमा मालिनीच्या ‘सीता और गीता’ चित्रपटातील ‘खिलाडी है कोई, अनाडी है कोई’ या गाण्यात शांताबाईंनी काम केले होते. त्या आपले कौशल्य कायम राखण्यासाठीच जगतात.

शांताबाई पवार म्हणतात, “मी आठ वर्षांची होते, तेव्हापासूनच मी माझ्या वडिलांकडून हे कौशल्य शिकले होते. लाठी-काठी फिरविण्याची कला माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आणि या कलेनेच मला जीवनात थोडीफार बरकत मिळवून दिली. मी ब-याच चित्रपटांमधून भूमिका केल्या असून त्यात सीता और गीता चित्रपटाचा समावेश आहे. मला पैशाची हाव कधीच नव्हती, पण मला माझी कला सा-या जगाला दाखवायची होती. माझ्या जीवनात सर्व काही बदललं असलं, तरी माझं लाठी-काठी फिरविण्याचं कौशल्य मात्र कायम राहिलं आहे. मी आजही त्याचं सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करते. मी आयुष्यभर हेच करीत आले आहे आणि ते करताना मला विलक्षण आनंद मिळतो”, असे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...