आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:‘शोले’ नाकारण्यामागचे खरे कारण शत्रुघ्न सिन्हांनी केले उघड, म्हणाले - 'शोलेमुळेच माझा प्रिय मित्र अमिताभ बच्चनला मोठा ब्रेक मिळाला'

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडियन आयडल 12 या शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांची खास उपस्थिती राहणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडल 12 मधील प्रतिभावान गायक आपल्या सुरेल, सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात येणार्‍या मान्यवरांमुळे या शोला चार चाँद लागतात. या वीकएंडला बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांची खास उपस्थिती राहणार आहे.

इंडियन आयडलचा आगामी भाग हा ‘शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा’ विशेष भाग असणार आहे. सर्व स्पर्धक शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत त्यांची गाजलेली गाणी सादर करताना दिसतील. मनमोकळ्या गप्पा-गोष्टींच्या ओघातपरीक्षक हिमेश रेशमिया या बॉलिवूड स्टारच्या प्रवासातील काही मजेदार किस्से उघड करताना दिसेल.

‘शोले’ चित्रपट न स्वीकारण्यामागचे खरे कारण काय होते?, या हिमेशच्या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “याला तुम्ही ‘मानवी चूक’ म्हणू शकता. रमेश सिप्पी साहेब भव्य चित्रपट बनवत असत आणि त्यांनी शोले बनवला तेव्हा तो खूपच गाजला आणि जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, भारतरत्न व ऑस्कर विजेते सत्यजीत यांनी देखील यांना देखील हा चित्रपट आवडला आणि त्यांनी ‘शोले’चे कौतुक केले.”

ते पुढे म्हणाला, “त्या काळात मी अशा काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये गुंतलेला होतो, ज्यात दोन नायक होते. कसे कोण जाणे, तुम्ही याला मानवी चूक म्हणा किंवा कदाचित माझ्या तारखांची समस्या असेल, पण मी शोले स्वीकारला नाही खरा. मला त्याचे वाईट वाटते आणि त्याच वेळी बरेही वाटते कारण शोलेमुळेच माझा प्रिय मित्र, राष्ट्रीय आयकॉन अमिताभ बच्चन याला मोठा ब्रेक मिळाला.”

शत्रुघ्न पुढे म्हणाले, “बर्‍याचदा तारखांच्या समस्येमुळे चित्रपट नाकारावा लागतो. अमिताभ बच्चनला कालीचरण करायचा होता, पण त्याला काही कारणाने नाही जमले. या गोष्टी स्वाभाविक आहेत. अगदी राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल यांनीही या ना त्या कारणाने काही चित्रपट नाकारले असतील. याला इलाज नाही.”

बातम्या आणखी आहेत...