आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीत सिद्धार्थ शुक्ला:सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिलचा भाऊ शहबाजने हातावर काढला सिद्धार्थच्या चेहऱ्याचा टॅट्यू, म्हणाला - तू माझ्या नेहमी आठवणीत आहेस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉसमध्ये झाली होती शहबाजची सिद्धार्थसोबत मैत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेकजण सिद्धार्थच्या आठवणीत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ शुक्लाची गर्लफ्रेंड शहनाज गिलचा भाऊ शहबाज गिल सिद्धार्थच्या जवळ होता. आणि त्याने हातावर टॅट्यू काढत अनोख्या पद्धतीने त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

शहबाज सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावूक झाला आहे. त्याने सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत हातावर सिद्धार्थच्या चेहऱ्याचा टॅट्यू काढला आहे. शेहबाजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टॅट्यू काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने ‘आम्हाला तुझी कायम आठवण येईल. तू माझ्यासोबत नेहमी जिवंत असणार आहेस. तू माझ्या नेहमी आठवणीत आहेस.’

बिग बॉसमध्ये झाली होती शहबाजची सिद्धार्थसोबत मैत्री
सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस 13 मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. याच शोमध्ये त्याची जोडी शहनाज गिलसोबत जमली होती. शोच्या फॅमिली वीकमध्ये शहबाद बिग बॉसच्या घरात आला होता. त्यावेळी त्याची सिद्धार्थसोबत मैत्री झाली होती. सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. चाहत्यांनी दोघांना सिडनाज हे नाज दिले होते. बिग बॉसनंतर हे दोघे अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र आले होते.

2 सप्टेंबर रोजी झाले निधन
सिद्धार्थचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. सिद्धार्थवर 3 सप्टेंबर रोजी अंत्य संस्कार करण्यात आले होते. सिद्धार्थच्या निधनाने शहनाजला मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थला अंतिम निरोप द्यायला टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...