आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी लग्नाच्या 18 वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. शिल्पाने एका मुलीला जन्म दिला आहे. अपूर्वने आपल्या वाढदिवसानिमित्त मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
ईशानी आहे शिल्पा-अपूर्वाच्या मुलीचे नाव
क्यूट व्हिडिओ शेअर करत अपूर्वने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस बनला आहे, कारण देवाने आम्हाला सर्वात खास, अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आणि चमत्कारी भेट दिली आहे. शिल्पा आणि मी आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्री हिची तुम्हाला ओळख करून देत आहोत. कृपया आमच्या मुलीला प्रेम आणि आशीर्वाद द्या,' अशा शब्दांत अपूर्वने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सेलिब्रिटी करत आहेत शुभेच्छांचा वर्षाव
ही बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण शिल्पा आणि अपूर्ववर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. करणवीर बोहराने पोस्टवर कमेंट करत लिहिले की, 'तुम्हीही पालक झाले आहात. व्वा.. मजा आली.' अभिनेता राजेश खट्टर यांनी लिहिले की, 'खूप अभिनंदन माझ्या मित्रा. आमच्याकडून ईशानीला खूप प्रेम आणि युवान खट्टरकडून जादूची झप्पी.'
शिल्पा-अपूर्वा बिग बॉसमध्ये एकत्र दिसले होते
बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 2004 मध्ये शिल्पा आणि अपूर्वने लग्न केले. दोघांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे. अपूर्व 50 वर्षांचा आहे, तर शिल्पा 40 वर्षांची आहे. हे दोघे रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसले आहेत. याशिवाय दोघे नच बलिए सीझन 1 मध्ये देखील दिसले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.